shruti marathe
shruti marathe instagram
मनोरंजन

‘मेरे होठों ने हर बात छुपाकर रखी थी’; श्रुती मराठेचं फोटोशूट व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटोशूटच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. श्रुतीने नुकत्याच एका खास फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रुतीने तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदांने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकते. नुकत्याच तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करताच तिला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या फोटोमध्ये श्रुती ब्राऊन कलरच्या फ्लोरल प्रिंट ड्रेसमध्ये दिसत आहे. फोटोला श्रुतीने कॅप्शन दिले,‘मेरे होठों ने हर बात छुपा कर रखी थी, आँखों को ये हुनर कभी आया ही नहीं’. श्रुतीच्या या फोटोला अभिनेत्री संकृती बालगुडेने कमेंट केली, ‘सेम कॅप्शन श्रु’. श्रुतीच्या एका चाहत्याने कमेंट केली, ‘समझने वाले जुबान आँखों की समजते है, जिसे बयान करना पडे, वो अक्सर खंजर खोपते है’. श्रुतीच्या या फोटोला एक लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

हेही वाचा : सोनू सूदला कोरोना; म्हणाला, 'क्वारंटाइन असलो तरी लोकांची मदत करत राहीन'

श्रुतीने ‘इंदिर विळा’ या तामिळ चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या ‘नान अवन इल्लै २’ या तमिळ चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यानंतर श्रुतीने मराठी मलिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. ‘राधा ही बावरी’ आणि ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकांमधील श्रुतीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. तसेच पुणे मुंबई पुणे -2, सनई चौघडे, शुभ लग्न सावधान, स्लॅम बूक या मराठी चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT