esakal | सोनू सूदला कोरोना; म्हणाला, 'क्वारंटाइन असलो तरी लोकांची मदत करत राहीन'
sakal

बोलून बातमी शोधा

sonu sood

सोनू सूदला कोरोना; म्हणाला, 'क्वारंटाइन असलो तरी लोकांची मदत करत राहीन'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. लॉकडाउनच्या काळात सोनूने गरीब मजूर आणि कामगारांची घरी जाण्यात मदत केली होती. त्यानंतरही विविध माध्यमांतून लोकांची मदत करत आहे. आता सोनू सूदला कोरोना झाल्याचं कळताच चाहत्यांनी त्याला इतरांसोबतच स्वत:चीही काळजी घेण्यास सांगितलं आहे.

सोनू सूदची पोस्ट

'आज सकाळी माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:ला आधीच क्वारंटाइन करून घेतलं असून योग्य ती काळजी घेत आहे. पण काळजी करू नका, यामुळे मला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. तुम्हा सर्वांच्या मदतीसाठी मी नेहमीच असेन हे लक्षात ठेवा', अशी पोस्ट त्याने लिहिली. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

लॉकडाउनच्या काळात गरीब मजुरांसाठी आणि कामगारांसाठी सोनू सूद 'देवदूत' बनून आला होता. काम आणि पैसा नसलेल्या गरीबांना त्याने सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम त्याने केलं होतं. परोपकाराचं हे काम त्याने अजूनही सुरू ठेवलं असून विविध प्रकारे तो गरजूंची मदत करत आहे.

हेही वाचा : कोरोना चाचणी करावी लागू नये म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर लोकांची पळापळ

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६३,७२९ नवे रुग्ण आढळले. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. याच काळात ३९८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ६ लाख ३८ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १ लाख १६ हजार रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत.

loading image