sidharth shukla 
मनोरंजन

मृत्यूसंदर्भातील सिद्धार्थचं 'ते' जुनं ट्विट पुन्हा व्हायरल

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

स्वाती वेमूल

प्रसिद्ध टिव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या Sidharth Shukla निधनाच्या काही तासांनंतर त्याचं एक जुनं ट्विट सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागलं आहे. सिद्धार्थने २०१७ साली मृत्यूसंदर्भातील एक ट्विट केलं होतं. तेच ट्विट आता पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांकडून व्हायरल होत आहे. गुरुवारी सकाळी सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करताच त्याला मृत घोषित करण्यात आले. सिद्धार्थच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा कुटुंब आहे.

काय आहे सिद्धार्थचं ट्विट?

'मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान नाही. आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान म्हणजे जिवंत असताना आपल्या आत एखादी गोष्ट मृत पावणे', असं ट्विट सिद्धार्थने २४ ऑक्टोबर २०१७ रोजी केलं होतं. त्याच्या या ट्विटवर चाहत्यांनी कमेंट्स करत दु:ख व्यक्त केलं आहे.

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात

सिद्धार्थने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'जाने पहचाने से.. ये अजनबी', 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. मात्र 'बालिका वधू' या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला.

बॉलिवूडमध्ये केलं काम

सिद्धार्थने बऱ्याच रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. 'झलक दिखला जा ६', 'खतरों के खिलाडी ७' आणि 'बिग बॉस १३' मध्ये तो झळकला होता. 'बिग बॉस ३'चं विजेतेपद त्याने पटकावलं होतं. २०१४ मध्ये सिद्धार्थने करण जोहर निर्मित 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Winter Session 2025 : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर पासून, सरकार अणू उर्जासह १० मोठी विधेयके मंजूर करण्याच्या तयारीत

आजचे राशिभविष्य - 23 नोव्हेंबर 2025

Sunday Morning Breakfast: रविवारी सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'पालक स्प्रींग रोल', सोपी आहे रेसिपी

Premanand Maharaj: कुंडलीत गुण तर जुळले तरीही भांडण होतात? प्रेमानंद महाराजांनी सांगितले लग्न टिकवण्यासाठी खास सिक्रेट

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

SCROLL FOR NEXT