Sidhu Moose Wala Murder Case Afsana Khan esakal
मनोरंजन

Sidhu Moose Wala Murder Case: मुसेवाला हत्याकांडात चर्चेत आलेली अफसाना खान आहे तरी कोण?

सकाळ डिजिटल टीम

मे महिन्यात पंजाबचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर सिद्धू मूसवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर सर्व देशचं हादरला. त्याच्या मृत्यूनंतर पोलीस आणि तपास यंत्रणा आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतांना दिसतं आहे.या हत्यांकाडात अनेक नाव समोर आली आहेत. त्याच्यासोबतच NIA सारखी मोठी तपास यंत्रणाही सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा तपास करत आहे.

दरम्यान, यात आता सिद्धू मुसेवाला हत्याकांडाशी त्याची जवळची मैत्रीण आणि पंजाबी गायिका अफसाना खानचे नाव समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार NIA ने या प्रकरणी अफसानाची चौकशी केली आहे. आता अफसाना नेमकी कोण आहे आणि याआधी ती कशी चर्चेत होती याबद्दल माहिती थोडक्यात माहिती...

अफसाना खान ही पंजाबची एक प्रसिद्ध गायिका आहे, तिचा जन्म 13 जून 1994 रोजी पंजाबमधील श्री मुक्तसर साहिबच्या बादल या गावात झाला होता. अफसानाचे सपूर्ण कुटुंब संगीताशीच जोडलेले आहे. तिचे आजोबा, वडील आणि भाऊ हे देखील संगीतकार आहेत, त्यामुळे शालेय दिवसांपासून अफसानाला संगीताची आवड होती.

तिने तिच्या सिंगिंग करिअरची सुरुवात रिअॅलिटी शोमधून केली. ती 2012 मध्ये 'व्हॉइस ऑफ पंजाब सीजन 3' या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये ती टॉप 5 मध्ये पोहोचली. यानंतर ती 'रायझिंग स्टार' या रिअॅलिटी शोचा भागही होती 'जट्टा सारेम वे तू ढाक्का करदे' या गाण्याने तिला खरी लोकप्रियता मिळली. सलमान खानचा बहुचर्चित शो ‘बिग बॉस 15’मध्येही दिसली होती.

अफसाना खानही नेहमीच वादत अडकतांना दिसली आहे. तिचा वादाशी संबंध फार जूना आहे. अफसाना विरोधात २०२० मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती तिने सरकारी शाळेत विद्यार्थ्यांसमोर वादग्रस्त गाणे गायिल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर अफसानावर कडाडून टिकाही झाली होती. इतकेच नाही तर 'बिग बॉस 15' चा भाग असताना  तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला शोमधून बाहेर काढण्यात आले होते.

अफसान खानला एनआयएने समन्स बजावले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात अफसानाची जवळपास 5 तास चौकशी करण्यात आली.  NIA ला असा संशय आहे की सिद्धूची मानलेली बहीण अफसाना हिचा कुठेतरी सिद्धूच्या हत्येशी संबंध आहे. याशिवाय अफसाना खानचा बंबीहा गँगशी संबंध असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थतीत अफसाना खानची आगामी काळात अजून कसून चौकशी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update : १९ व्या फेरीत सुनेत्रा पवारांनी केला पराक्रम, तब्बल १ लाख ६८ हजार मतांची आघाडी

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

Thermos Linked to Eye Injury Risk: थर्मास ठरतोय डोळ्यांसाठी धोकादायक? नव्या समस्येमुळे जगभरात ८ दशलक्षांहून अधिक प्रोडक्ट्सचा रीकॉल

'तुझा नेता हरतोय...' तरुणाने अफवांवर विश्वास ठेवला; थलपती विजयच्या चाहत्याने निकालाआधीच टोकाचा निर्णय घेतला

West Bengal Election Results : पश्चिम बंगालमध्ये ममतांचा गेम कसा पलटला? भाजपच्या ५ डावांनी बदललं संपूर्ण राजकारण!

SCROLL FOR NEXT