singer and actress aarya ambekar praised pm modi for his lakshadweep visit SAKAL
मनोरंजन

Aarya Ambedkar: आर्या आंबेकरला नेमकं म्हणायचं काय? पंतप्रधान मोदींचा फोटो पोस्ट करत म्हणाली...

आर्या आंबेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय गायिका

Devendra Jadhav

Aarya Ambedkar News: आर्या आंबेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय गायिका - अभिनेत्री. आर्याने तिच्या सुमधूर गायनाने लाखो लोकांच्या मनावर राज्य केलं. हृदयात वाजे समथिंग असो की केवड्याचं पान असो आर्याची गाणी अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये असतील.

अशातच आर्याने सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक पोस्ट केलीय. काय म्हणाली आर्या? बघा.

आर्याने पंतप्रधान मोदींना उद्देशून केली पोस्ट

आर्या आंबेकरने पंतप्रधान मोदींचा एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोंमध्ये मोदींची लक्षद्वीपमधली पोस्ट दिसतेय. हे फोटो पोस्ट करुन आर्या लिहीते, "माझा भारत देश सर्वात चांगला आहे. आणि माझ्या देशाचे पंतप्रधान सर्वात बेस्ट आहेत."

अशाप्रकारे आर्याने पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय.

aarya ambekar

मोदींनी केलेलं फोटोशूट चर्चेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी एक दिवस निवांत बीचवर वेळ घालवला.

यामध्ये त्यांनी वॉटर स्पोर्ट्स तसेच स्नॉर्कलिंगचा आनंदही लुटला. लक्षद्वीप या बेटावरील सौंदर्याचं यावेळी मोदींनी कौतुक केलं आहे. 

लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न?

नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला फोटोशूट केल्यावर अमित शहांनी ट्विट केलं की, "मनमोहक समुद्रकिनारे, निळ्या पाण्याचे सरोवर आणि बरंच काही लक्षद्वीपमध्ये आहे. ज्यामध्ये जागतिक पर्यटन स्थळ बनण्याची अफाट क्षमता आहे. यासाठी पंतप्रधानांचे आभार की त्यांनी लक्षद्वीपला प्रोत्साहन देण्यासाठी फोटोशूट केलं. यामुळं पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल आणि त्यामुळं तिथल्या लोकांचं जीवनमान उंचावेल"

त्यामुळे PM मोदींनी लक्षद्विपच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी इथल्या बीचेसवर फोटोशूट केलं आणि ते फोटो सोशल मीडियातून शेअरही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विरोधकांसमोर मोदी सरकार झुकलं! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत अमित शहा संसदेत देणार निवदेन, नेमकं काय घडतंय?

Google Drive Update: 10 ऑगस्टपासून फोटो बॅकअप बंद! Google Drive युजर्सनी फोटो-व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' सेटिंग लगेच बदला

6,6,6,6,6,6! सहा चेंडू, सहा षटकार... युवराज सिंगसारखी तुफान फटकेबाजी, पण इंग्लंडच्या फलंदाजाचा हा पराक्रम आहे थोडा वेगळा Video

Jharkhand Protest : JPSC-JSSC वाद पेटला, आंदोलक विद्यार्थी तारेचे कुंपण भेदून विधानसभेसमोर पोहोचले, पोलिसांकडून लाठीचार्ज

RINKU SINGH LOVE STORY: एका ‘लाईक’पासून सुरू झाली लव्हस्टोरी; प्रियाने सांगितला रिंकूसोबतच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा

SCROLL FOR NEXT