Singer Farmani Naaz Father And Brother Arrested By Police In Murder Case  Esakal
मनोरंजन

Farmani Naaz: 'हर हर शंभू' गाण्याची गायिका फरमानीच्या वडील अन् भावाला अटक!

Vaishali Patil

Singer Farmani Naaz's father and brother murderers: 'हर हर शंभू' गाण्याची गायिका फरमानी नाज ही पुन्हा चर्चेत आली आहे. काही महिन्यांपुर्वी तिचा चुलत भाऊ खुर्शीदची चाकूनं भोकसून हत्या करण्यात आली होती. आता तिच्या भावाच्या हत्येचे गुढ उकलले आहे.

मुझफ्फरनगर पोलिसांनी तिच्या कुटुंबाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. फरमानीचा भाऊ आणि वडिलांसह अन्य 2 जणांना अटक केली आली आहे. चुलत भावाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासोबतच हत्येसाठी वापरण्यात आलेले दोन चाकू आणि एक दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.

5 ऑगस्ट रोजी रतनपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहम्मदपूर माफी गावात खुर्शीदवर काही दुचाकीस्वार हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला होता. खुर्शीदला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. आता या घटनेमागे फरमानीचाच भाऊ आणि वडील असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणी गायक फरमानी नाजचे वडील आरिफ आणि भाऊ फरमान यांच्यासह अन्य दोन आरोपी फरियाद आणि झाकीर यांना अटक करण्यात आली आहे.

अनैतिक संबंधांच्या संशयावरून फरमानी नाजचे वडील आरिफ आणि भाऊ फरमान आणि अन्य दोन साथीदारांच्या मदतीने खुर्शीदची हत्या केली. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना चौकशीनंतर तुरुंगात पाठवले आहे. एसपी ग्रामीण अतुल कुमार श्रीवास्तव यांनी याबद्दल माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT