Singer Rahul Jain accused of raping costume stylist at his Mumbai flat sakal
मनोरंजन

त्याने घरी बोलावलं अन्.. गायक राहूल जैन विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल..

एका स्टायलिस्टने गायक राहुल जैन याच्या विरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

नीलेश अडसूळ

rahul jain : पंकज त्रिपाठीच्या 'कागज' या चित्रपटातील 'जुग जुग जियो' सारख्या गाण्यांना आवाज देणारा गायक राहुल जैन (Rahul Jain) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कॉस्टयूम स्टाइलिस्टने मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार केली आहे. (Singer Rahul Jain accused of raping costume stylist at his Mumbai flat)

मुंबईतील एका 30 वर्षीय स्टायलिस्टने हा आरोप केला असून, 'राहुलने मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये बोलावून माझ्यावर बलात्कार केला.' असे तिचे म्हणणे आहे. पण राहुल जैन याने मात्र हा आरोप फेटाळला आहे. या आरोपाला कोणतेही तथ्य नाही, असे त्याने म्हंटले आहे.

ओशिवारा पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात संबंधित पीडितेने म्हंटले आहे की, 'राहुलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला. सुरवातीला त्याने माझ्या कामाचे कौतुक केले. त्याने मला त्याच्या अंधेरी येथील फ्लॅटमध्ये येण्यास सांगितले, माझी पर्सनल स्टायलिस्ट होशील का असेही विचारले. त्यानुसार 11ऑगस्टला मी राहुल जैनच्या फ्लॅटवर गेले होते. राहुलने काही वस्तू दाखवण्याचं कारण सांगून बेडरूममध्ये नेलं आणि माझ्यावर बलात्कार केला.'

पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये तिने असेही सांगितले आहे की, 'जेव्हा तिने राहुलला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तीला मारहान केली. एवढेच नाही तर संबंधित पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला.' पण राहुलने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. 'मी त्या महिलेला ओळखत नाही. तिने लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. यापूर्वीही एका महिलेने माझ्याविरोधात अशा प्रकारचा आरोप लावला होता. त्यावेळेसही मला न्याय मिळाला,'अशा शब्दात तिने हे या आरोपांना विरोध केला आहे.

गेल्या वर्षीही एका गीतकार आणि रायटरने राहुल जैनच्या विरोधात बलात्कार, जबरदस्तीने गर्भपात करणे आणि फसवणूक करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मूळचा इंदूरचा असलेल्या राहुल जैनने २०१६ मध्ये 'फीवर' या चित्रपटातील 'तेरी याद..' या गाण्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आजवर त्याने २५० हून अधिक म्युझिकल ट्रॅक केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT