मनोरंजन

'किती दिवस कंगनाचं नाव घेऊन चालवणार घर'?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी कंगनानं देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर भाष्य केले होते. देशाला लढून नव्हे तर भीक मागून स्वातंत्र्य मिळाल्याचे तिनं सांगितले होते. आता त्यावर नेहमी तिची मिमिक्री करणाऱ्या एका सेलिब्रेटीला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. आणि तिच्यावर आगपाखड केली आहे.

सलोनी गौर ही युट्युबवर कंगनाची मिमिक्री करणारी सेलिब्रेटी म्हणून प्रख्यात आहे. तिचा सोशल मीडियावर चाहतावर्गही मोठा आहे. आता चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे. नेहमी कंगनाची टर उडवून तिच्या नावानं पैसे कमवणाऱ्या सलोनीला नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. सलोनीनं सोशल मीडियावर कंगनाची मिमिक्री करणारा एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे की, ट्विटरच्या सीईओसाठी एक महत्वाचा संदेश तो असा की, जर या सीईओंना असं वाटलं तर कंगनाची पुन्हा वापसी होऊ शकते. परागजी आपलं स्वागत. जर वीर दासच्या मते दोन भारत आहेत तर आपल्या दोघांनाही त्यासाठी प्राऊड फिल करायला हवं.

आपण सगळे एका देशातून आलो आहोत. त्यामुळे तिथली परिस्थिती आपल्याला ज्ञात आहे. अशावेळी आपण त्याचा गंभीरपणे विचार करुन काही निर्णय घ्यायला हवेत. असेही सलोनीनं म्हटलं आहे. अजूनही आपल्या मानसिकतेमध्ये काहीही फरक पडलेला नाही. सलोनीच्या या व्टिटवर एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं लिहिलं आहे की, सलोनी जी तुम्ही जर कंगना नसत्या तर तुम्ही काही बेरोजगार झाल्या नसत्या. सध्या तुम्ही तिच्याच नावानं पैसे कमवत आहात. तुम्ही एक कथित कॉमेडियन आहात. कंगनाची मिमिक्री करुन पैसे कमवता. तेव्हा बोलताना विचार करा. या शब्दांत सलोनीची निंदा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT