गेल्या दहा वर्षापासून कॅनडाची राजधानी असलेल्या Ottawa येथे Ottawa Indian Film Festival होत असतो. यंदाही या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये यावर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड सोलापूरच्या (Solapur) अक्षय इंडीकरला (Akshay Indikar) मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारसोबतच (Best Director) स्थलपुराण या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार नील देशमुख या बालकलाकारास मिळाला आहे. अक्षयला मिळालेला हा बहुमान ही मराठी सिनेसृष्टीसाठीच नव्हे तर अवघ्या भारतीय सिनेजगतासाठी अभिमानाची बाब आहे.(Solapur Akshay Indikar wins the Best Director award of Ottawa Indian Film Festival)
अक्षयच्या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. यामध्ये जागतिक सिनेमातील दर्जेदार चित्रपटांची यादी बनवणाऱ्या mubi.com या प्रतिष्ठित संकेतस्थळावर दिग्दर्शक अक्षय इंडीकर याच्या 'स्थलपुराण' (Chronicle of Space) या फिल्मला स्थान मिळाले आहे. डॅनियल सॅमन या मान्यवर चित्रपट समीक्षकांनी ही यादी तयार केली आहे. अमेरिकेतून प्रसिद्ध होणारी ही यादी जागतिक सिनेमा विश्वात महत्वाची मानली जाते. या यादीत साय मिंग यांग, आबेल फेररास हाँग साँग यू अशा मान्यवर आणि 'कांस'सारख्या आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवात सन्मानित दिग्दर्शकांच्या चित्रपटांसोबत अक्षयच्या 'स्थलपुराण'ची घेतली गेलेली दखल म्हणूनच कौतुकास्पद आहे. संजय शेट्ये यांनी 'स्थलपुराण'ची निर्मिती केली आहे.तसेच केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'स्थलपुराण' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अशियाई चित्रपट आणि बेस्ट भारतीय दिग्दर्शक असे दोन मोठे पुरस्कार देखील मिळाले आहेत. आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ख्याती असलेला 'यंग सिनेमा अवॉर्ड' हा पुरस्कार देखील अक्षय इंडीकरला मिळालेला आहे.
अक्षय इंडीकर यांचा मराठी चित्रपट 'स्थलपुराण' हा आठ वर्षाच्या दिघूची कथा सांगतो. वडील बेपत्ता झाल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी तो तळमळीने प्रयत्न करतो. पण शेवटी शोध न लागल्याने कोकणात आयुष्याच्या संघर्षासह आजी-आजोबांबरोबर राहायला जातो. चित्रपटाच्या कथेतील बदल आणि होणारा तोटा या दोन्ही बाजू या चित्रपटाद्वारे दाखविण्यात आल्या आहेत.भाषेची प्रदेशिकतेची बंधनं ओलांडून मराठी सिनेमा महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या बाहेर घेऊन जाता आलं याचा आनंद आहे, सिनेमाला भाषा नसते तर सिनेमा हीच त्यांची भाषा असते. आमच्या सिनेमाचा विषय आणि त्याची मांडणी हटके झाली आहे. 26 आणि 29 फेब्रुवारीच्या शो वेळी आम्हाला बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये रेड कार्पेटचा सन्मान मिळाला होता. त्यानंतर आमच्या सिनेमाची दखल जगभर घेतली जात असल्यामुळे आमचे स्वप्न सत्यात उतरले असल्याचा आनंद आम्हाला झाला आहे, सोबतच निर्माते, संजय शेट्ये, कॅमेरामन, सर्व टीमचं यश आहे असे अक्षय आणि तेजश्री यांनी सांगितले.
अनेक संघर्षातून घडून आता इतर धडपड्या कलाकार, दिग्दर्शकांना नेहमीच मदत करणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप स्वतः अक्षयची मुलाखत घेतली होती हे मराठी चित्रपट आणि एकूणच तरुण दिग्दर्शक यांच्यासाठी दिशादर्शक ठरले आहे.लॉस एंजेलिसच्या IFFLA फेस्टिवलमध्ये 'स्थलपुराण' क्लोजिंग फिल्म दाखवली गेल्यानंतर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनं अक्षयचं भरभरुन कौतुक केलं होतं. इतकंच काय अनुराग स्वत: अक्षयला भेटण्यासाठी त्याच्या घरी देखील गेला होता. अक्षयनं याबाबतचा अनुभव सोशल मीडियावर शेअर देखील केला होता. अनुरागनं अक्षय इंडीकरची मुलाखत घेऊन त्याचा आतापर्यंचा प्रवास उलगडला. त्यात अक्षयने पुढील चित्रपट 'Construction' हा घेऊन येत असल्याचं देखील म्हणलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.