'आमिरसोबत राहणं कठीण'; खुद्द किरणने केला होता खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kiran rao and aamir khan

'आमिरसोबत राहणं कठीण'; खुद्द किरणने केला होता खुलासा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान (aamir khan) आणि किरण राव (kiran rao) हे दोघे सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे चर्चेत आहेत. १५ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या जोडीला त्यांच्या चाहत्यांची नेहमी पसंती मिळाली. पण त्यांच्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला आहे. किरणने आमिरसोबतच्या नात्याबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. (kiran rao talk about her husband aamir khan and her relationship)

किरणने मुलाखतीमध्ये सांगितले, 'आमिरच्या आयुष्यात स्वत:ला फिट करणे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. कारण आमिर त्याच्या पहिल्या पत्नीसोबतच्या (रीना) घटस्फोटानंतर अत्यंत कठीण काळाचा सामना करत होता. आमिरसोबत राहणे खूप अवघड होते, कारण त्याला पार्टी करायला अजिबात आवडत नाही. लाऊड म्युझिकदेखील त्याला आवडत नाही. अनेकांना असे वाटते की आमिर खूप सिरीयस राहतो. पण तो सिरीयस नाहिये. तो खूप आनंदी राहणारा माणूस आहे. तो आपल्या कुटुंबासोबत पुर्णपणे संलग्न आहे.'

आमिरने किरणसोबतच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत सांगितले

आमिरने मुलाखतीमध्ये सांगितले होते की किरण त्याला एकदा म्हणाली, 'तुला आमची काळजी नाही. असे वाटते की तुझ्यासाठी आम्ही कोणीच नाहीये. जरी तू आमच्यासोबत असलास तरी तुझे मन दुसरीकडे आहे. मला माहीत आहे की तू आमच्यावर प्रेम करतो. तरी देखील मी या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. मी जर तुला बदलायचा प्रयत्न केला तर, ते चुकीचे असेल. कारण मी तुझ्यामध्ये बदल केला तर तू ती व्यक्ती राहणार नाही जिच्यावर मी प्रेम केले.'

घटस्फोट घेण्याच्या निर्णय घेतल्यानंतर आमिर आणि किरणने स्पष्ट केले की, 'या सुंदर १५ वर्षांमध्ये आम्ही आयुष्यभराचा आनंद, हास्य यांचा अनुभव घेतला आणि त्यातून या नात्यात एकमेकांविषयी आदर, प्रेम आणि विश्वास वाढला. आता आम्हाला आमच्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरू करायला आहे. पण पती-पत्नी म्हणून नाही तर पालक आणि एकमेकांचे कुटुंब म्हणून. विभक्त होण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती आणि आता आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत. मुलगा आझादचं संगोपन आम्ही दोघं मिळून करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्ट्सवर सोबत काम करणार आहोत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचे खूप आभार, कारण त्यांनी या निर्णयात आमची साथ दिली आणि आम्हाला समजून घेतलं. आमच्या हितचिंतकांनीही शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला द्याव्यात. घटस्फोट म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे'