Sonalee Kulkarni Google
मनोरंजन

सोनाली डिजिटल विश्वात,तिचा थ्रीलर 'बेस्टसेलर' कुठे पाहू शकाल,वाचा...

या वेबसिरीजमध्ये तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती,श्रृती हसन,गौहर खान,आर्जुन बाजवा मुख्य भूमिकेत आहेत.

प्रणाली मोरे

सोनाली कुलकर्णीनं(Sonalee Kulkarni) मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनयाच्या-नृत्याच्या जोरावर आपलं नाव कमावलं आहे. इतकच काय तर बॉलीवूड(Bollywood) मध्येही तिनं केव्हाच एन्ट्री मिळवली आहे. कोरोनाचे निर्बंध उठविल्यानंतर जेव्हा सिनेमागृह खुली झाली तेव्हा मराठीत प्रदर्शित झालेल्या तिच्या 'झिम्मा' आणि 'पांडू' सिनेमांनी बॉक्सऑफिसवर कमाल करून दाखवली. आता सोनालीनं डिजिटल विश्वात एन्ट्री केली आहे, ती तिच्या आगामी 'बेस्टसेलर' या वेब सिरीजच्या माध्यमातून. अॅमेझॉन प्राइमवर तिची ही वेब सिरीज १८ फेब्रुवारी २०२२ पासून आपल्या भेटीस येत आहे. अर्थात मराठी प्रेक्षकांसाठी सोनालीनं दिलेली ही मनोरंजनाची नवी मेजवानी असणार आहे.

या सिरीजमध्ये तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती,गौहर खान,श्रुती हसन,अर्जुन बाजवा असे बडे हिंदी स्टार्सही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या थ्रीलर वेबसिरीज मध्ये सोनालीनं आतापर्यंतच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी व्यक्तीरेखा साकारली असणार हे त्या सिरीजचा प्रोमो पाहून लक्षात येते. स्वतः सोनालीनं एका मुलाखतीत सांगितलं आहे की,'' या सिरीजमधलं थ्रील लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणार आहे. कल्पनेपलिकडील एक गोष्ट यात पहायला मिळणार असल्याचंही तिनं नमूद केलं आहे. यातील प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांना तर्क-वितर्क लावण्यास आणि ते दरवेळी बदलण्यास भाग पाडतील'' असंही ती म्हणाली.

Sonalee Kulkarni in Bestseller webseries with Mithun Chakraborty,Gauahar Khan, and Arjan Bajwa

या सिरीजमध्ये सोनाली एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ''ही भूमिका साकारताना मला दिग्दर्शकानं फक्त एकच सांगितलं होतं ही पोलिस ऑफिसर खूप वेगळी आहे,दबंग गर्ल नाही,डोळ्यातून ती व्यक्त होणारी आहे. नेहमीच्या पोलीस ऑफिसरसारखी ही भूमिका करायची नाही. आतापर्यंत तू जसे पोलीस ऑफिसर पाहिले असशील तसं करू नकोस. ही ऑफिसर खूप स्पष्टवक्ती आहे''. सोनालीच्या भूमिकेचे नाव आहे उर्मिला. तिचे बहुतांशी सिनेमातील सीन हे मिथुन चक्रवर्तींसोबत होते. ज्यांनी या सिनेमात ACP लोकेश प्रमाणिकची भूमिका केलीय. ''मिथुनजींसोबत जमून आलेली माझी भन्नाट केमिस्ट्री ही वेबसिरीज पाहताना लक्षात येईल. सिनेमा शूट होण्याआधीच काही मीटिंगच्या निमित्तानं मिथुन चक्रवर्ती यांना भेटले त्यामुळे आमच्यात तेव्हापासनंच चांगलं ट्युनिंग झालं. ज्याचा फायदा सिनेमातील भूमिकेचा ग्राफ रंगवताना झाला. आणि अर्थातच पडद्यावर आम्हाला एकत्र पाहताना प्रेक्षकवर्ग आमचे ते एकत्र केलेले सीन एन्जॉय करतील'', असही सोनाली कु्लकर्णी पुढे म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT