mauli
mauli 
मनोरंजन

'माऊली' मधील 'माझी पंढरीची माय' गाणे प्रदर्शित

सकाळवृत्तसेवा

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'माऊली' या चित्रपटातील 'माझी पंढरीची माय' हे गाणे आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. रितेशच्या लय भारी या सिनेमातील 'माऊली माऊली' हे गाणे खूप गाजले होते, त्यामुळे 'माझी पंढरीची माय' हे गाणे प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

हे गाणे रितेश देशमुख, अभिनेत्री सैयामी खेर, संगीतकार व गायक अजय-अतुल यांच्यावर चित्रित झाले आहे. गाण्यामधील दृश्य व सिनेमेटॉग्राफी आकर्षित करणारी असून त्याला अजय-अतुल यांच्या आवाजाची व संगीताची साथ लाभली आहे. रितेश देशमुखने आपल्या फेसबुक अकाऊंटद्वारे हे 'माऊली'मधील हे गाणे शेअर केले आहे व त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आजच्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, माऊलीचं पहिलं गाणं!!' 

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा टीझर अभिनेता शाहरूख खान याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते. तर आज हे गाणे अक्षय कुमारनेही आपल्या फेसबुक अकाऊंचवरून शेअर केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT