sonu sood rangoli make by his fan in solapur with 7 tons powder and 87000 square feet on republic day sakal
मनोरंजन

Sonu Sood: सोनू सूद भारावला! सोलापूरच्या चाहत्यानं काढली 87 हजार स्क्वेअर फुटाची रांगोळी..

व्हिडीओ शेअर करत सोनूही झाला नतमस्तक..

नीलेश अडसूळ

Sonu Sood News: साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता सोनू सूद आज लोकांसाठी मसिहा बनला आहे.

पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू कोरोना या कामात खरा हिरो म्हणून पुढे आला सोनूने प्रवासी मजुरांपासून ते कोरोनाच्या कामात अडचणीत सापडलेल्या सर्वांना ज्या प्रकारे मदत केली ते कोणीही विसरू शकत नाही.

आजही त्याच्या घरासमोर लोकांची गर्दी असते आणि त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्याचा तो सर्वतोपरी प्रयत्न करतो. अशाच, सोनू सूद साठी, त्याच्या कार्याला वंदन करण्यासाठी सोलापूर येथील एका चाहत्याने मोठा विक्रमच केला आहे.

(sonu sood rangoli make by his fan in solapur with 7 tons powder and 87000 square feet on republic day)

सोलापूरच्या चित्रकार विपूल मिरजकरने तिरंगा रांगोळी काढून सोनूला सलामी दिली आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर स्वतः या रंगोळीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये एक भव्य दिव्य रांगोळी दिसत आहे. ज्यामध्ये तिरंग्यात सोनू सूद दिसतो आहे. ही रांगोळी सोलापूरातील विपुल मिरजकर ने काढली असून त्याचा आकार 87 हजार स्क्वेअर फुट आहे. यासाठी विपुलने 7 टन रांगोळी वापरली आहे.

विपुलने यासाठी अनेक दिवस खर्च केले पण अखेर प्रजासत्ताक दिनी ही रांगोळी पूर्ण झाली. या रांगोळीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सोनू सूदने (Sonu Sood) रांगोळीचा व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "माझ्याकडे खरचं शब्द नाहीत. चाहत्यांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. अशी भव्य रांगोळी काढण्याऱ्या कलाकाराचे आभार... मला त्याचा खूप अभिमान आहे". असे सोनू म्हणाला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT