Aryan Khan News esakal
मनोरंजन

आर्यन खानला पासपोर्ट परत करा, स्पेशल कोर्टाचे एनसीबीला आदेश

आर्यन खानला पासपोर्ट परत करा

सकाळ डिजिटल टीम

आर्यन खानला पासपोर्ट परत करण्याचे आदेश स्पेशल कोर्टाने एनसीबीला (NCB) आज दिले आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) गेल्या वर्षी क्रूझ ड्रग्स प्रकरणी अडकला होता. त्याला २ ऑक्टोबर २०२१ रोजी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात क्लिनचिट मिळाल्यानंतर आर्यनने स्पेशल एनडीपीएस न्यायालयात पासपोर्ट परत करण्याचे आणि बाँड रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. आर्यन खान प्रकरणात विशेष न्यायालयानं एक महत्वाचा निर्णय दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान प्रकरणाची चर्चा आहे. त्यात न्यायालयाकडून कोणता आदेश दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या प्रकरणी माहिती देताना आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी सांगितले की, जेव्हा एखाद्या आरोपीवर कारवाई करण्याचे थांबवले जाते तेव्हा जो आदेश न्यायालयाकडून दिला जातो त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. यावर विशेष न्यायाधीश यांनी देसाई यांना उलट प्रश्न केला. तो असा की, तुम्हाला आर्यन खानचा बेल बाँड आणि पासपोर्ट पुन्हा हवा आहे का, त्यावर देसाई यांनी आम्हाला एनसीबीकडून उत्तर मिळाले आहे. त्यांना आता आरोपी आर्यन खानकडून कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे सांगण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे त्याच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळालेला नाही. आणि त्याच्या विरोधात कोणतीही चौकशी केली जाणार नाही.

या प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT