Tom holland
Tom holland 
मनोरंजन

स्पायडर मॅनचा अभिनेता टॉम वेटरच्या नोकरीसाठी गेला, मॅनेजरनं चक्क...

सकाळ डिजिटल टीम

Hollywood News: हॉलीवूडमध्ये सर्वाधिक चित्रपटांच्या यादीत स्पायडर मॅन (Spider Man) चित्रपटाचा समावेश करावा लागेल. आतापर्यत सर्वाधिक कमाईचे रेकॉर्ड या चित्रपटाच्या नावावर आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजमधला शेवटचा भाग प्रदर्शित झाला होता. त्यालाही (entertainment news) प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या टॉमच्या वेगवेगळ्या आठवणींना सोशल मीडियावरुन (Tom Holland) उजाळा मिळताना दिसतो आहे. त्यामध्ये त्यानं अभिनेता होण्यापूर्वी काय केले होते, त्यानं केलेल्या नोकऱ्या, त्याचा संघर्ष हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्य़ाच्याविषयी जाणून घेण्यास तरुणाई उत्सुक असते. याचा प्रत्यय त्याचे चित्रपट पाहताना आला आहे.

स्पायडर मॅन चित्रपटात काम करण्यापूर्वी टॉमनं एका हॉटेलमध्ये बार टेंडरची नोकरी करणं पसंत केलं होतं. तो त्याच्या मुलाखतीला देखील गेला होता. मात्र त्यावेळी त्याच्या वाट्य़ाला अपयश आले. त्याला त्या हॉटेलच्या मॅनेजरनं चक्क बाहेर हाकलून दिलं. टॉमनं एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगितली होती. टॉम हॉलंडनं सांगितलं की, मला कुणाही नाटकात, चित्रपटात काम करतो म्हणून सहजासहजी काम देणार नाही याची कल्पना होती. त्यामुळे मी अनेकदा वेष बदलून काम मिळते याचीही चाचपणी केली होती. मात्र यासगळ्याचा काहीही उपयोग झाला नाही.

मी जेव्हा वेश बदलून एका बार मध्ये गेलो होतो तेव्हा त्या बारमालकाला सर्व परिस्थिती कथन केली होती. मला काही दिवस कामावर ठेवून घ्यावे अशी विनंतीही मी त्यांना केली होती. मात्र त्यांनी काही माझे ऐकले नाही. आणि मला चक्क हाकलून दिले. या गोष्टीचे मला खूप वाईट वाटले. कारण मला कुणीच कामावर ठेवून घ्यायला तयार नव्हते. काही दिवसांपूर्वी टॉम हॉलंडचा स्पायडर मॅन नो वे होम हा स्पायडर मॅनच्या सीरिजमधील शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अवघ्या काही दिवसांत या चित्रपटानं कोट्यवधी रुपयांचा व्य़वसाय जगभरात केल्याचे दिसून आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: सगळी स्वप्ने पूर्ण होतील.. पंतप्रधान मोदींची शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर!

Narendra Dabholkar Murder Case: दाभोलकर खून प्रकरणी कोर्टाने सुनावले पोलिसांना खडे बोल! तावडे, पुनाळेकर, भावे का ठरले निर्दोष?

Impact Player: रोहित शर्मासह अनेकांनी टीका केलेला इम्पॅक्ट प्लेअर नियम IPL मधून होणार बाद? जय शाह म्हणाले...

PM Modi: 'इथले आदिवासी हे आफ्रिकन आहेत का?', पंतप्रधान मोदींचा नंदुरबारमध्ये सवाल; काँग्रेसवर केली टीका

Ye Re Ye Re Paisa: "कुणी पैशात खेळतं, तर कुणी पैशासाठी..!"; 'येरे येरे पैसा 3' ची घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

SCROLL FOR NEXT