squid game  netflix india
मनोरंजन

Netflix सीरिज Squid Gameने मोडले विक्रम; ठरतेय सर्वाधिक लोकप्रिय

या कोरियन वेब सीरिजला जगभरात दमदार प्रतिसाद मिळतोय.

स्वाती वेमूल

या कोरियन वेब सीरिजला जगभरात दमदार प्रतिसाद मिळतोय.

Squid Game Web Series: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक दमदार वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. १७ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर 'स्क्विड गेम' Squid Game ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजने अवघ्या महिन्याभरात अनेक विक्रम मोडले आहेत. या कोरियन वेब सीरिजला जगभरात दमदार प्रतिसाद मिळतोय.

'स्क्विड गेम'चं कौतुक करत नेटफ्लिक्सने लिहिलं, 'दक्षिण कोरियाच्या स्क्विड गेम या सीरिजने आतापर्यंत अनेक लोकप्रिय वेब सीरिजना मागे टाकलं आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय.' काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्रॅफिकच्या नियमांबाबत एक ट्विट करताना या सीरिजचा आधार घेतला गेला. स्क्विड गेमच्या एका छोट्या क्लिपच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना ट्रॅफिकचे नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

या वेब सीरिजने अवघ्या महिन्याभरात १३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरिज ब्रिजर्टनलाही स्क्विड गेमने मागे टाकलं आहे. 'बिजर्टन'ला एका महिन्यात ८ कोटी २० लाख इतके व्ह्यूज मिळाले होते. स्क्विड गेम या सीरिजला ३० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित केलं गेलं आहे. सीरिजचे एकूण ९ एपिसोड्स असून ८ तास १२ मिनिटांचा पहिला सिझन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT