subhedar movie box office report in front of jawan srk shah rukh khan  SAKAL
मनोरंजन

Subhedar: शाहरुखच्या जवानसमोर सिंहगडाचा पोवाडा गाजतोय, सुभेदारचा चौथा आठवडा, कमावले इतके कोटी

सुभेदार सिनेमाने जवानसमोर बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली

Devendra Jadhav

Subhedar vs Jawan: शाहरुख खानचा जवान बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई करत आहे. जवानने आजवर ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई करत आहे. जवान रिलीज होऊन १ आठवडा पूर्ण झाला.

पण मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे जवानसमोर सुभेदार सुद्धा अजुन थिएटरमध्ये तळ ठोकून आहे. जवानसमोर सुभेदारने यशस्वी चौथा आठवडा पूर्ण केलाय. याशिवाय बॉक्स ऑफीसवर सुद्धा तुफान कमाई केलीय.

(subhedar movie box office report in front of jawan srk shah rukh khan)

सुभेदार सिनेमाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी कामगिरी

सुभेदार सिनेमाचा सिनेमागृहात यशस्वी चौथा आठवडा सुरु झालाय. सुभेदार सिनेमाने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केलीय.

sacnilk च्या अहवालानुसार, सुभेदारने आतापर्यंत १५ कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याची शक्यता आहे. जवानच्या रिलीजमुळे सुभेदारला फटका बसला असला तरीही सुभेदार सिनेमागृहात ठाण मांडून आहे. मराठी प्रेक्षक सुभेदार सिनेमाला पसंती दर्शवत आहे.

सुभेदार मध्ये लोकप्रिय कलाकारांची फौज

शिवराज अष्टकातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' यानंतर 'सुभेदार' हा पाचवा भाग शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प आहे.

सुभेदार सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

सुभेदार सिनेमाचा नवीन रेकॉर्ड, ठरला पहिला मराठी सिनेमा

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार सिनेमाची उत्कंठा शिगेला आहे. अशातच सिनेमाच्या टीमने सर्वांना आनंदाची बातमी दिलीय.

"प्रदर्शनाआधीच बुक माय शो वर 40K+ इंटरेस्टेड लाईक्स मिळालेला पहिला मराठी चित्रपट 'सुभेदार' !" हा पहिला मराठी सिनेमा ठरलाय.

अशाप्रकारे ४० हजारांहून अधिक प्रेक्षक रिलीजआधीच सुभेदार सिनेमा पहायला उत्सुक आहेत. Book My Show वर असा रेकॉर्ड करणारा सुभेदार हा पहिलाच मराठी सिनेमा ठरलाय.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT