Jacqueline Fernandez Instagram
मनोरंजन

'जॅकलिन-सुकेश होते रिलेशनशिपमध्ये', वकीलाचा दावा

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आलं नवीन वळण.

सकाळ डिजिटल टीम

मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (jacqueline Fernandez) आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) यांना ईडीने समन्स पाठवला होता. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) हे मुख्य आरोपी आहेत. पण आता या प्रकरणाला नवीन वळण आलं आहे. जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये होते, असा दावा सुकेशचे वकिल अनंत मलिक यांनी केला आहे.यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिनची दोनदा चौकशी केली आहे. तसेच याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

सुकेशचे वकिल अनंत मलिक म्हणाले, "जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश एकमेकांना डेट करत होते. मी हे जे बोलतोय ते अगदी खरं आहे." नंतर नोरा विषयी बोलताना ते म्हणाले," नोरा फतेही स्वत:ला पीडित म्हणवत आहे, पण सत्य हे आहे की तिला BMW कार गिफ्ट करण्यात आली होती. खरं तर नोरा आणि जॅकलिन या दोघीही या प्रकरणातील महत्त्वाच्या दुवा आहेत, आणि त्यामुळेच त्यांना प्रश्नोत्तरासाठी बोलावले जात आहे."

मात्र, जॅकलिनच्या प्रवक्त्याने तिच्यावरचे आरोप फेटाळले आहेत. “जॅकलिन फर्नांडिसला ईडीने साक्षीदार म्हणून बोलावले आहे. तिने तिचे जबाब नोंदवले असून, ती यापुढेदेखील तपासकार्याला पूर्णपणे सहकार्य करेल." सोबतच जॅकलिनने सुकेश आणि तिच्या रिलेशनशिपबद्दल केलेल्या वक्तव्याला पूर्णपणे नकार दिला आहे. ”

पीएमएलए कायद्यातंर्गत जॅकलीनचे स्टेटमेंट नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जॅकलीनचे आर्थिक व्यवहार आणि सुकेश चंद्रशेखरसोबत तिची ओळख यामुळे ती ईडीच्या रडारवर आहे. तर,ऑगस्टमध्ये, ईडीने सुकेशच्या काही जागांवर छापे टाकले होते,तेव्हा त्याचा चेन्नईतील बंगला, ₹ ८२.५ लाख रोख रक्कम आणि १२ आलिशान कार जप्त केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT