Sunny Deol shares photo with father Dharmendra: Esakal
मनोरंजन

Dharmendra: आजारी कसले, धर्मेद्र तर मस्तपैकी...! सनीनं तो फोटो शेयर करुन दिली अपडेट

Vaishali Patil

Sunny Deol shares photo with father Dharmendra: बॉलिवूड अभिनेता सनी देओल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या गदर 2 या चित्रपटामुळे चर्चेत होता. तब्बल दोन दशाकानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग रिलिज झाला आणि या चित्रपटालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

11 ऑगस्टला रिलीज झालेला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींच्यावर कमाई केली आहे. 'गदर 2'ची 38 दिवसांची एकूण कमाई आता 519.43 कोटींवर पोहोचली आहे. चित्रपट रिलिज होऊन महिना झाला असला तरी चाहते हा चित्रपट पाहत आहे. दरम्यान चित्रपटाच्या यशाचा आनंद सनी देओल पुरेपुर घेत आहे.

काही दिवसांपुर्वी सनी देओल वडील धर्मेंद्र यांच्यासोबत अमेरिकेला रवाना झाला होता. धर्मेंद्र आजारी असल्याने त्यांना तातडीने अमेरिकेला रवाना केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या मात्र सनीने या बातमीचे खंडन केले होते. सनी आणि त्याचे वडील धर्मेंद्र हे दोघेही अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेत आहे. आता सनीने त्याचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे.

सनी देओल नेहमीच त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याला त्याचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडते. सोशल मीडियावरही तो जास्त सक्रिय नसतो. मात्र आता त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत त्याच्या वडिलांबद्दल अपडेट चाहत्यांसोबत शेयर केली आहे. सनी आणि धर्मेंद्र तिथे पिझ्झाचा आस्वाद घेतांना दिसत आहे. 'वडिल आणि मी शांततेत पिझ्झाचा आनंद घेतांना..' असं कॅप्शन सनीने या फोटोला दिले आहे.

त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी या फोटोवर कमेंट करत आहेत. तर धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलनेही या फोटोवर कमेंट केली आहे. या फोटोत धर्मेंद्र हे फिट दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्या होत्या. त्यामुळे सनी त्यांना घेऊन अमेरिकेला गेला असं बोलण्यात आलं होत मात्र सनीने या वृत्तांचे खंडन केले आणि तो सुट्टी घालवण्यासाठी परदेशात गेल्याचे सांगितले.

धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास 87 वर्षीय धर्मेंद्र आजही तितकेच फिट आहेत. नुकतेच ते करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासोबत दिसले. या चित्रपटात त्यांच्या किसींग सीनची खुप चर्चा रंगली होती. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रदर्शित झाला. आता ते आणखी काही चित्रपटात काम करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

NRAI Demands Immediate Restoration of Commercial LPG Supply : एमएनजीएल (MNGL) पाईपलाईन आता वेगाने धावणार? हॉटेल उद्योगासाठी मोठी बातमी.

SCROLL FOR NEXT