Sunny Deol brutually trolled unny Deol at Raj Kumar Kohli's prayer meet  Esakal
मनोरंजन

Sunny Deol Trolled: राजकुमार कोहली यांच्या शोकसभेत गेलेला सनी देओल का होतेय इतका ट्रोल?

राजकुमार कोहलीच्या सन्मानार्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

Vaishali Patil

Sunny Deol brutally trolled: प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे 24 नोव्हेंबर रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

'जानी दुश्मन' आणि 'नागिन' यांसारख्या चित्रपटांसाठी राजकुमार कोहली यांना ओळखले जायचे. त्यांच्या निधनानंतर रविवारी त्यांचा मुलगा अरमान कोहली याने शोक सभेचे आयोजन केले होते.

यावेळी राजकुमार कोहली यांना श्रद्धांजली देण्यासाठी या प्रार्थना सभेत अनेक कलाकार उपस्थित होते.

यावेळी सनी देओल, जॅकी श्रॉफ, शत्रुघ्न सिन्हा, जॅकी श्रॉफ, राज बब्बर आणि विंदू दारा सिंह यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही राजकुमार कोहलींच्या शोकसभेला हजेरी लावली होती

या प्रार्थना सभेदरम्यान सनी देओलचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगानं व्हायरल होत आहे. इतकच नाही तर या व्हायरल व्हिडिओमुळे नेटकरी त्याला ट्रोलही करत आहे.

या व्हायरल व्हिडिओत सनी देओल हा विंदू दारा सिंह यांच्याशी बोलताना दिसत आहे. मात्र तो जोर जोरात हसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी सनीवर खुपच नाराज झाले आहेत. चित्रपट निर्मात्याच्या शोक सभेत हसल्याबद्दल त्याच्यावर टीका होत आहे.

"ही शोकसभा आहे की पार्टी?" तर दुसर्‍याने लिहिले, "निर्लज, मृत माणसाच्या मुलासमोर असा हसतोय." तर एकानं लिहिलय, “प्रार्थना सभेत कोण इतकं हसते?” निर्लज्ज.'' अशा अनेक कमेंट नेटकरी या व्हिडिओला करत आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, राजकुमार कोहली शुक्रवारी सकाळी आंघोळीसाठी गेले होते. बराच वेळ झाला मात्र ते बाहेर न आल्याने अरमानने बाथरुमचा दरवाजा तोडला तेव्हा त्याचे वडील जमिनीवर पडलेले दिसले. घरी आलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT