TET Admit Card sunny leone photo esakal
मनोरंजन

TET Admit Card: विद्यार्थीनीच्या परीक्षा प्रवेशपत्रावर चक्क 'सनी लियोनी'!

या प्रकरणानंतर प्रशासनानं चौकशीचे आदेश दिले आहेत. त्या फोटोनं मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Karnataka TET Admit Card: सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवेशपत्रावर बॉलीवूड सेलिब्रेटींचे फोटो छापून येणं ही गोष्ट यापूर्वी देखील घडली आहे. मात्र ज्या सेलिब्रेटीचा फोटो व्हायरल झाला आहे त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कर्नाटकातील एका विदयार्थीनीच्या परीक्षा प्रवेशपत्रावर चक्क सनी लियोनीचा फोटो छापून आल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे.

त्याचे झाले असे की, कर्नाटकामध्ये टीईटी परिक्षेच्या संदर्भातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परीक्षा विभागाला देखील नवल वाटले आहे. अॅडमिट कार्डवर सनी लियोनीचा फोटो छापून आल्यानं त्यांना काय बोलावे, त्यावर काय उत्तर द्यावे असा प्रश्न पडला आहे. यासगळ्या प्रकरणाची माहिती कर्नाटक कॉग्रेसचे चेअरमन बी आर नायडू यांनी ट्विट करुन दिली आहे. शिक्षकांची भरती असलेल्या टीईटी परीक्षा प्रवेश पत्रावर सनी लियोनीचा फोटो आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. असे नायडू यांनी म्हटले आहे.

TET Admit Card

सनी लियोनीची मनोरंजन विश्वात असलेली ओळख सर्वांनाच माहिती आहे. अशावेळी तिचा फोटो एखाद्या विद्यार्थीनीच्या प्रवेश पत्रावर छापून आल्यानं त्या विद्यार्थीनीची देखील मानहानी आहे. असे तक्रारदारानं म्हटले आहे. संसदेत जे खासदार पॉर्न व्हिडिओ पाहतात त्यांच्याकडून आणखी कोणत्या प्रकारची अपेक्षा करणार असा प्रश्न नायडू यांनी आपल्या व्टिटमधून उपस्थित केला आहे. किमान शिक्षणात तरी राजकारण करु नका, त्यासाठी अशा गोष्टींचा वापर करु नका. या शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

याप्रकरणाची कर्नाटक शिक्षण विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यावर राजकारणही तापले आहे. कॉग्रेस आणि बीजेपी यांच्यात वाद सुरु झाला आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर या प्रकरणानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Latest Marathi News Live Update : गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार- चंद्रशेखर बावनकुळे

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT