No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

Trump Iran Conflict Protests : व्हाईट हाऊसने या आंदोलनांना “ट्रम्प-विरोधी वेडेपणा” असे म्हणत आंदोलकर्त्यांना फेटाळले आहे. आयोजकांच्या मते, या आंदोलनात सुमारे ९० लाख लोक ५० राज्यांतील ३,१०० हून अधिक ठिकाणी सहभागी होत आहेत.
Thousands of protesters gather across major US cities, including Washington D.C., demanding accountability from Donald Trump over Iran conflict and domestic policies under the “No Kings Protest” movement.

Thousands of protesters gather across major US cities, including Washington D.C., demanding accountability from Donald Trump over Iran conflict and domestic policies under the “No Kings Protest” movement.

esakal

Updated on

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू झाली आहेत. ट्रम्प यांच्या विरोधातील ही निदर्शने अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये होत आहेत. या आंदोलनांना "नो किंग्स प्रोटेस्ट" (No Kings Protest) असे नाव देण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या विरोधातील "नो किंग्स प्रोटेस्ट"ची ही तिसरी लाट आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की, ते ट्रम्प यांच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करत आहेत. या धोरणांमध्ये इराणसोबतचे युद्ध, स्थलांतरितांना लक्ष्य करणारे कायदे आणि वाढती महागाई यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com