srk sushant 
मनोरंजन

किंग खानचा चाहता होता सुशांत सिंह, नक्कल करताना पाहून शाहरुखने दिली होती अशी रिएक्शन..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा लहानपणापासून मोठा चाहता होता. सुशांत सिंहने अनेक कार्यक्रमात आणि जिथे संधी मिळेल तिथे शाहरुखनप्रती त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं आणि त्याला स्वतःचं प्रेरणास्त्रोत बनवलं होतं. आता सुशांत सिंह राजपूत आणि शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सुशांत सिंह शाहरुखच्या स्टाईलची नक्कल करत एक डायलॉग बोलत आहे.

सुशांतचा हा व्हायरल व्हिडिओ रिऍलिटी शो 'इंडिया पुछेगा.. सबसे श्याना कौन?' मधील आहे. हा शो शाहरुख खान होस्ट करत होता. गेल्या दिवसात सुशांत सिंह राजपूतचा डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्क्षी रिलीज झाला होता आणि तो या शोमध्ये सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आला होता. या व्हिडिओमध्ये सुशांत सिंह राजपूतने धोती-कुर्ता घातलेला दिसतोय. शाहरुख खानच्या शोमध्ये येऊन तो खूप आनंदी दिसत होता. 

व्हायरल व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळतंय की सुशांत प्रेक्षकांना सांगतोय की तो लहानपणापासून शाहरुखचा खूप मोठा चाहता आहे आणि शाळा कॉलेजमध्ये असल्यापासूनंच तो त्याची सिग्नेचर हात पसरवणा-या स्टाईलची नक्कल करायचा. त्यानंतर तो शाहरुख खानचा सुपरहिट सिनेमा 'चक दे' इंडियामधील प्रसिद्ध डायलॉग बोलण्याची परवानगी मागतो. यानंतर सुशांत सिंह म्हणतो, 'इस इलाके का गुंडा मै हूं.' त्यानंतर तो गुडघ्यावर बसतो शाहरुखच्या रोमँटींक अंदाजात त्याची हात पसरवण्याची स्टाईल करतो. सुशांतने शाहरुख समोरंच त्याची केलेली ही नक्कल पाहून रिएक्शन देतो.

शाहरुख खुप खुश होतो आणि त्याला प्रेमाने मिठी मारतो. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मिडियावर सध्या घराणेशाहीवरुन वाद पेटला आहे.   

sushant singh rajput fans of shah rukh khan from childhood and loved his loving impression  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT