Sushmita Sen Latest News Sushmita Sen Latest News
मनोरंजन

सुष्मिताने एक्स बॉयफ्रेंडसोबत बघितला चित्रपट; यूजर्सनी मोदीबद्दल विचारला प्रश्न

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

सकाळ डिजिटल टीम

Sushmita Sen Latest News ब्युटी क्वीन सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिताने ललित मोदीसोबतचे नाते अधिकृत केले. ललित मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सुष्मिता पुन्हा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत (Rohman Shawl) दिसली. सुष्मिता व रोहमनला एकत्र पाहून लोकांना धक्का बसला आहे.

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे स्क्रिनिंग आदल्या दिवशी आयोजित करण्यात आले होते. सुष्मिता आपल्या मुलींसोबत आमिर खान आणि करिना कैफचा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. सुष्मितासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलही (Rohman Shawl) दिसला. मात्र, ललित मोदी (Lalit Modi) तिथे उपस्थित नव्हते. ललित मोदींऐवजी सुष्मिताला एक्स बॉयफ्रेंडसोबत पाहून लोक आश्चर्यचकित झाले.

सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि रोहमन शॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्स सुष्मिता सेनला ललित मोदीबद्दल विचारत आहे. एका यूजरने लिहिले की, ललित मोदी कुठे आहेत? तर दुसऱ्या यूजरने लिहिले, काय चालले आहे? तिसऱ्याने लिहिले, तुला काय करायचे आहे? यापूर्वी सुष्मिता सेन रोहमन शॉलसोबत पार्टी करताना दिसली होती.

सुष्मिताच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये रोहमन शॉल मागील बाजूस दिसला होता. रोहमन शॉलला सुष्मिता आणि कुटुंबीयांसोबत मस्ती करताना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये वेगळे झाले होते. रोहमनसोबत ब्रेकअप झाल्यानंतरच सुष्मिताने ललित मोदीसोबत डेटिंग केल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली होती. आता सुष्मिताला रोहमन शॉलसोबत पाहून यूजर्स पुन्हा एकदा गोंधळात पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

फसवून लाटलेली जागा-जमीन मिळते परत! ३ वर्षांच्या आत द्यावी लागते तक्रार; फसलेल्याने वकिलांमार्फत ‘येथे’ करावा अर्ज, ‘या’ ६ बाबी लक्षात ठेवाच...

Phaltan Crime: फलटणमध्‍ये हल्ल्यांचे सत्र सुरूच; दोन व्‍यावसायिकांपाठोपाठ दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनाही जबर मारहाण, काय कारण?

आजचे राशिभविष्य - 25 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT