Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Wedding Esakal
मनोरंजन

Swanandi- Ashish Wedding: गौतमी पाठोपाठ स्वानंदीच्या घरीही लगीनघाई! मेंहदीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

स्वानंदी - आशिष कुलकर्णीच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे.

Vaishali Patil

Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Wedding: मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. काही दिवसांपुर्वी 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन लग्नगाठ बांधली आहे. तर दुसरीकडे मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकर सोबत लग्न करणार आहे.

त्यांच्या लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. त्यांच्या मेंहदीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता त्यातच आणखी एक कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ही जोडी म्हणजे सर्वांची लाडकी जोडी स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी.

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांनी काहीच दिवसांपुर्वी साखरपुडा केला. स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाची आता सर्वांना उत्सुकता होतीच. अशातच स्वानंदी - आशिष कुलकर्णीच्या घरी लगीनघाई सुरु झालीय.

रविवारी या जोडप्याचा मेंहदी सोहळा पार पडला आहे. स्वानंदी - आशिष कुलकर्णी यांनी नुकतेच तिच्या सोशल मीडियावर मेहंदीचे फोटो शेअर केलेत. 'ही #ANANDI मेहंदी' असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

स्वानंदी - आशिष या दोघांच्या नावाचा आनंदी हा हॅशटॅग तिनं तयार केला आहे. आशिष - स्वानंदीच्या मेंहदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. नेटकरी दोघांचे कौतुक करत आहेत.

या फोटोत मेहंदी सोहळ्यासाठी त्यांनी खास फुलांची आकर्षक सजावट केली होती. तर बोर्डवर 'वेलकम टू स्वानंदीची मेहंदी…' असं लिहिण्यात आल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्या घरी आता लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. आज स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांना हळद लागणार आहे. तर हे दोघे 25 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.

कोण आहे स्वानंदीचा बॉयफ्रेंड?

स्वानंदीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे आशिष कुलकर्णी. आशीष कुलकर्णी हा संगीतकार आहे. आशिष कुलकर्षी हा गायक - संगीतकार आहे. तो इंडीयन आयडॉल 12 व्या सीझनमध्ये सहभागी होता. आशिष कुलकर्णी स्वत:चे लाईव्ह शोज सुद्धा करतो.

आशिष आणि स्वानंदी बऱ्याच दिवसापासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघेही लग्न करणार असल्याने त्याचे चाहते खुप उत्सुक आहेत. या कपलवर चाहते कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT