Swapnil Joshi
Swapnil Joshi Esakal
मनोरंजन

Swapnil Joshi: 'अचानक...' स्वप्निलची लेकीसाठी भावनिक पोस्ट... वाचून नेटकरीही इमोशनल

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वात स्वप्निल जोशी हा लोकप्रिय चेहरा आहे. त्याच्या लूकवर लाखो मुली फिदा असतात. मात्र सर्वांचा आवडता स्वप्निल हा देखील एका मुलीचा बाबाही आहे. स्वप्निल नेहमीच त्यांची मुलगी मायरा हिच्यासोबत धमाल मस्ती करतांनाचे व्हिडिओ फोटोज चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा हिरो असतो. मात्र स्वप्निल हा अभिनेत्याबरोबरचं उत्तम वडीलही आहे. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. स्वप्निल आपल्या कामाबरोबरचं त्याच्या कुटुंबालाही वेळ देत असतो. तो मुलांसोबत नेहमीच धमाल करतांना दिसून येतो.

अशातच नेहमी धमाल मस्तीचे व्हिडिओ टाकून हसवणाऱ्या स्वप्निलने आपल्या लेकीसाठी एक भावनिक पोस्ट करत सर्व चाहत्यांना इमोशल केलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

स्वप्निल जोशीने त्याच्या इस्टांग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ स्वप्निलची मुलगी मायराचा आहे. या व्हिडिओत स्वप्निलची लाडोबाई पारंपरिक वेषभूषेत दिसत आहे. तिने काठापदराची साडी परिधान केली आहे. ज्यात ती खुपचं गोड दिसतेय.

हा व्हिडीओ शेअर करत त्याने एक कॅप्शन दिलयं ज्यामुळं सर्वच भावूक होत आहेत. स्वप्निलने लिहिलयं 'अचानक मोठी झाली यार'. खरतर स्पप्निलच्या या व्हिडिओतुन मुलींच्या पालकाचे दु:ख त्याची मनाची अवस्था सांगितली आहे.

मुली कधी मोठ्या होऊन जातत हे वडीलांना कळत नाही. मुलीच आणि वडीलांच नातचं मुळात तसं असतं. मुलगी वडिलांना नेहमीच लहान वाटतं असली तरी ती बघता बघता मोठी होते आणि वडीलांच घर सोडून जाते. स्वप्निलचा हा व्हिडीओ पाहून सर्वच भावुक झाले आहे

त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलयं की, "मुली अशाच पटकन मोठ्या होतात बापाला कळत पण नाही आणि जातात नवऱ्याच्या घरी. वाईट पण खरे आहे"

दुसऱ्यां पालकाने लिहिलयं, 'मुलीने शाळकरी वयात असताना अशी साडी नेसली की बापाच्या काळजाचा ठोका च चुकतो..'

तर एकानं लिहिलयं, असेच असते सर.. मुली खूप लवकर मोठ्या होतात अचानक आपल्याला लक्षात येतं .....कालपर्यंत आपल्या पाठीवर खेळणारी ..कधी आपल्या खाद्यापर्यंत पोहोचते ते कळतच नाही'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT