Urfi Javed: इच्छा पुर्ण...शेवटी उर्फीला बेड्या ठोकल्याचं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

Urfi Javed: इच्छा पुर्ण...शेवटी उर्फीला बेड्या ठोकल्याचं!

बिग बॉस ओटीटी फेम आणि अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळं वादात असतेच. मात्र सध्या उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादामुळं चर्चेत आहे. उर्फी चित्रा वाघ यांना डिवचण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहिये.

खरं तर याची सुरुवातही चित्रा वाघ यांनीच केली त्यांनी उर्फीच्या कपड्यावर टिका करत तिला बेड्या ठोकण्यांची मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी तिला जेलमध्ये टाकण्याची मागणीच नव्हे तर ती दिसल्याचं तिला मारण्याचीही धमकी दिली.

हेही वाचा: Urfi Javed: ऐकेल ती उर्फी कसली! चित्रा वाघ यांच्यासाठी उर्फीची नवी फॅशन..

त्यानंतर उर्फीनेही चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिलं. त्याच बरोबर व्हिडिओ शेअर करत तिच्या फॅशनचा अविष्कार करण्याचं काही थांबवलं नाही. आता पुन्हा उर्फीनं तिची फॅशनचं टॅलेंट दाखवत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "तुम्हा सर्वांना खरोखरच मला हँडकफमध्ये पाहायचे होते. बरोबर? इच्छा पुर्ण" असं म्हणतं तिने टिका करणाऱ्यांची इच्छा पूर्ण केली आहे . उर्फीनं इन्स्टावर नवीन लूक शेअर केला आहे. ज्यात तिच्या हातात हातकड्या अटकवलेल्या आहेत.

हेही वाचा: Urfi Javed Tweet: 'चित्राजी संजय आठवतो का?' उर्फीनं चित्रा वाघ यांची कुंडलीच काढली

हातात हातकडी, काळ्या रंगाची बिकिनी घातलेली उर्फी या व्हिडिओत जमिनीवर बसून सेक्सी पोझ देत आहे. उर्फीनं केसांची वेणी आणि डार्क मेकअपसह बिकिनी लुक कॅरी केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने पुन्हा ती कुणालाच घाबरत नसून तिला वाटेल तशीच ती वागेलं असं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: Urfi Javed: खुद्द वडिलांनी २ वर्षे केला शारीरिक व मानसिक छळ' अशी आहे उर्फीची कहाणी..