Swapnil Joshi shared ukhana post for wife on 11th wedding anniversary sakal
मनोरंजन

Swapnil Joshi: घाबरून असतो बायकोला.. स्वप्नील जोशीचा बायकोसाठी खास उखाणा..

अभिनेता स्वप्नील जोशी याने लग्नाच्या ११ व्या वाढदिवशी एक खास उखाणा घेतला आहे.

नीलेश अडसूळ

swapnil joshi : मराठीतील एक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ख्याती असलेला अभिनेता स्वप्नील जोशी, सध्या बराच चर्चेत आहे. मध्यंतरी केलेली पायी वारी असो, 'चला हवा येऊ द्या' मध्ये विशेष भूमिका असो किंवा 'तू तेव्हा तशी' या मालिकेतील सौरभ पटवर्धन. स्वप्नील हा कायमच प्रेक्षकांना भावाला आहे. विशेष म्हणजे यशाच्या इतक्या मोठ्या शिखरावर असूनही तो सर्वांशी आपुलकीने वागताना दिसतो. आज त्याने आपल्या बायकोसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे. यावेळी त्याने बायकोसाठी एक खास उखाणा घेतलेला असून त्याचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

(Swapnil Joshi shared ukhana post for wife on 11th wedding anniversary)

स्वप्नील जोशीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खास त्याने बायकोसाठी तयार केला आहे. यामध्ये स्वप्नील आणि त्याची पत्नी लीना यांचे अनेक फोटो आहेत. या व्हिडिओ मध्ये त्याने एक उखाणा घेतला आहे. तो म्हणतो, 'घाबरुन असतो मी बायकोला.. असलो जरी हौशी.. कारण दात तोडायचं ऑफिशिअल लायसन्स म्हणजे आमची लीना जोशी', असा गमतीशीर उखाणा त्याने घेतला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

पुढे तो कॅप्शन मध्ये म्हणाला आहे, 'हसवल्याबद्दल धन्यवाद... मला कुटुंब दिल्याबद्दल धन्यवाद... आठवणींबद्दल धन्यवाद... वेडेपणाबद्दल धन्यवाद. विचित्रपणाबद्दल धन्यवाद. सर्व लहान-सहान गोष्टींसाठी धन्यवाद. देव तुला कायम असाच आनंद देत राहो...' स्वप्नील यावेळी काहीसा भावूक झालेला दिसला. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नाच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त त्याने ही पोस्ट केली आहे. स्वप्नीलचे दुसरे लग्न आहे. पहिल्या घटस्फोटानंतर त्याने लीना आराध्ये सोबत 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. गेली ११ वर्षे ते सुखी संसार करत असून त्यांना दोन आपत्य आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20I : हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन; दोन वर्षांनंतर तगडा खेळाडू परतणार, भारताची संभाव्य Playing XI

Dada Bhuse : "हिंदुत्वाशी तडजोड नाही, पण इस्लाम पक्ष सेक्युलर"; दादा भुसेंच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : पुण्यात उद्या सायकल स्पर्धेनिमित्त काही रस्ते बंद

Vasant Panchami 2026: वसंत पंचमीचा खरा आनंद अनुभवायचा आहे? भारतातील 'या' 5 ठिकाणांना आजच भेट द्या

Municipal Votes : मतदान नेमके कमी पडले कुठे?; पराभूत उमेदवारांकडून शोध सुरू, ‘रसद वाटप’ही संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT