swara bhaskar  
मनोरंजन

'तर तुम्ही जगातील सर्वात मोठ्या गाढवांपैकी एक' अभिनेत्री स्वराची पोस्ट

बॉलीवूडमध्ये bollywood काही सेलिब्रेटी हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे ओळखले जातात.

युगंधर ताजणे

बॉलीवूडमध्ये bollywood काही सेलिब्रेटी हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे ओळखले जातात. त्यांना भवतालच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींवर आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसतात. यात सगळ्यावर आघा़डीवर असणारी सेलिब्रेटी अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत kangana ranaut. या अभिनेत्रीनं आतापर्यत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्विटरनं तिचं अकाउंटच सस्पेंड केलं होतं. त्याचे पडसादही सोशल मीडियावर उमटले होते. आता दुसरी अभिनेत्री स्वरा भास्करही swara bhaskar सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे.

करिना कपूर खान kareena kapoor khan आणि सैफ अली खान saif ali khan हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपं आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत त्यांच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते. त्यांनी त्यांच्या पहिल्या अपत्याचं नाव तैमुर असं ठेवलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. आता ते पुन्हा चर्चेत आले आहे त्याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवले आहे. अशी चर्चा आहे. त्यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अर्थात त्यांनी आपल्या मुलाचे नाव काय ठेवायचे हा त्यांचा प्रश्न असल्याचं मत अभिनेत्री स्वरानं मांडताना जे याप्रकरणी चर्चा करत आहे त्यांच्यावर टीका केली आहे.

करिना कपूरच्या दुसऱ्या मुलाचे नाव सध्या वादाचा विषय आहे. दुसरीकडे करिनाच्या प्रेग्नंसी बायबलही चर्चेत आलं आहे. करिनाच्या सपोर्टसाठी स्वरा आता मैदानात उतरली आहे. तिनं तिच्या बाजूनं एक पोस्ट केली आहे. त्यातून करिनाला ज्यांनी ट्रोल केलं आहे त्यांच्यावर स्वरानं टीका केली आहे. स्वराचं ते व्टिट व्हायरल होताना दिसत आहे. स्वरानं आपल्या व्टिटमध्ये लिहिले आहे की, जर एखाद्या पालकांनी त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं आणि तुम्ही त्या बाळाचे पालक नसाल तर यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? आता त्या बाळाचे नाव काय असावं आणि ते तसे का आहे तुमच्या डोक्यात काही नावांच्या बाबत वेगळ्या प्रकारची भावना आहे. त्यामुळे तुमचे विचारही त्याप्रमाणे झाले आहेत. मात्र त्याचा त्रास इतरांना होतो याचा विचार कोणी करायला मागत नाही.

तुम्ही जर एखाद्या भावनेच्या आहारी जात असाल तर तुम्ही या जगातल्या सर्वात मोठ्या गाढवांपैकी एक आहात. अशा प्रकारची प्रतिक्रिया स्वरानं दिली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. स्वरानं आपल्या त्या व्टिटबरोबर #Jehangir #mindyourownbusiness या हॅशटॅगचा वापर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: राजकारणात मोठा ट्विस्ट! काकांनी नाकारलं; पवार–शिंदे युतीमुळे नवं समीकरण तयार होणार? पुण्यात पडद्यामागे घडामोडी

Smith Surpasses Dravid: ऑस्ट्रेलिया 'बॉक्सिंग डे' टेस्ट हरले, पण कर्णधार स्मिथने द्रविड-कोहलीला मागे टाकत रचले मोठे विक्रम

Nagpur Municipal Election : ...तर एकत्र लढणार ‘महाविकास आघाडी’; काँग्रेसकडून ३२ जागा सोडण्याची शक्यता

Viral Video: विराट कोहलीचा व्हिडिओ काढण्यासाठी एका ड्रायव्हरने लढवली अनोखी शक्कल, नेटकरी म्हणाले...

Crime News : 'पीडितेने जबाब बदलला तरीही...' मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला हायकोर्टाचा मोठा झटका

SCROLL FOR NEXT