Tamannaah Bhatia  
मनोरंजन

तमन्ना भाटियाच्या विमानात विराट कोहली काय करतोय? फोटो चर्चेत 

स्वाती वेमूल

टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे नेटकरी तिला क्रिकेटर विराट कोहलीवरून प्रश्न विचारत आहेत. तमन्नाने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. विमान प्रवासातील हा फोटो असून या फोटोमुळे अनेक इन्स्टाग्राम युझर्स तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तमन्ना भाटिया आणि विराट कोहलीचं काय कनेक्शन आहे? आणि विमानात ते कसे एकत्र आले? त्याच झालं असं की, तमन्नाने तिच्या खासगी जेटमधील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोत तमन्नाने हातामध्ये एक ट्रे धरला असून, तो ट्रे चीप्स आणि केक्सनी भरलेला आहे.  तमन्नाच्या मागे मेक-अप आर्टिस्ट फ्लोरीयन ह्युरेल आणि निलम केनिया आहेत. 'ब्रेकफास्ट प्लीज' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. 

तुम्ही म्हणाल, या फोटोमध्य एवढं काय खास आहे. तर या फोटोतील फ्लोरीयनच्या लूकने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. फ्लोरीयनची चेहरेपट्टी क्रिकेटपटू विराट कोहलीशी मिळती-जुळती आहे. हा फोटो पाहिल्यानंतर एका चाहत्याने, 'हा किंग कोहली सारखा दिसतोय', असे म्हटले आहे, तर दुसऱ्या युझरने विराट कोहली मागे का बसलाय? असं विचारत हसण्याचा इमोजी पोस्ट केलाय. शुक्रवारपासून आयपीएल स्पर्धा सुरु झाली. त्यामुळे तमन्ना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या उद्घाटनाच्या सामन्याला गेली होती का? असे सुद्धा प्रश्न काही इन्स्टा युझर्सनी विचारले आहे. 

तमन्ना तिच्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी फ्लोरियन आणि निलमसोबत प्रायव्हेट जेटने हैदराबादला गेली होती. '११ द अव्हर' असे या वेब सीरिजचे नाव असून त्यात तिने व्यावसायिकेची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत 'बोले चुडिया' या चित्रपटातही मुख्य भूमिका साकारणार आहे. काही तेलुगू चित्रपटांचे ऑफर्सदेखील तिच्या हातात आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT