esakal
मनोरंजन

Bando Mein Tha Dum: ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी विजयावर येतीय वेब सीरीज , पहा ट्रेलर

भारताने ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची गाथा सांगणारी वेब सिरीजचा ट्रेलर लाँच.

धनश्री ओतारी

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय - आधुनिक काळातील सर्वात मोठ्या मालिका विजयाची कथा सांगणारा - बंदों में था दम, या बहुप्रतीक्षित वेब सिरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे. ही वेबसिरीज १६ जूनला रिलीज होणार आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून मालिका 2-1 फरकाने जिंकली आहे. भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर (Border Gavaskar trophy) पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं आहे.

लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारताला 328 धावांची आवश्यकता होती. शुभमन गिलच्या उत्कृष्ठ खेळीमुळे भारताची सुरुवात चांगली झाली होती. त्यामुळे भारताला या सामन्यात लय गवसली आणि एकीचे बळ दाखवत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. कारण गेल्या 32 वर्षांपासून ब्रिस्बेनच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाने आपलं एकतर्फी वर्चस्व कायम राखलं होतं.

याच घटनेवर अधारीत दिग्दर्शक नीरज पांडे 'बंद में था दम' या आगामी वेब सीरिजमध्ये 2020/21 च्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर क्रिकेटप्रेमींना घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

'बंद में था दम' ही मालिका भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्या घरच्या गाब्बा मैदानात अविस्मरणीय विजय मिळवण्यापूर्वी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकते. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 32 वर्षे एकही कसोटी सामना गमावला नव्हता. त्यामुळे या विजयाचे एक वेगळे महत्त्व आहे.

नीरज पांडेने हा ट्रेलर शेअर करीत त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले, "जेव्हा सर्व काही त्यांच्या विरोधात होते, तेव्हा ते उभे राहिले आणि त्यांनी जगाला त्यांची खरी जिद्द, ताकद आणि दृढनिश्चय दाखवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान लढतीच्या कथेचा साक्षीदार व्हा. कसोटी इतिहासातील भारताच्या सर्वात मोठ्या विजयामागील कथा. बंदों में था दम - भारताच्या अभिमानाची लढाई."

1988 पासून या मैदानावर 31 सामने खेळले गेले

1988 पासून ऑस्ट्रेलियाने या मैदानावर एकूण 31 सामने खेळले आहेत. यातील 24 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहे, तर उरलेले 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. ऋषभ पंतने विजयी चौकार लावून भारताच्या खेम्यात विजय खेचून आणला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT