Tejaswini pandit Share photo as a kamakhya Goddess on the occasion of navratri festival 2019  
मनोरंजन

तेजस्वीनी सांगतेय, का करावी कामाख्या देवीची पूजा?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नवरात्रोत्सवाला उत्साह आणि भक्तीमय वातावरणात सुरवात झाली आहे. नवरात्रातील नऊ दिवस नऊ देवींची रुप आणि त्यांचे महत्व सांगण्याचा प्रयत्न अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने केला आहे. देवीच्या रुपांचे फोटो तिने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिनेकामाख्या देवीच्या रुपातील फोटो शेअर केला आहे. त्याकामाख्या देवीच्या रुपाला अनुसरुन तिने कॅप्शनही दिले आहे.

'वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश... प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते.
वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदीहीवनाची (पाण्याची ) नवनिर्मिती करते तेंव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे. जिथे नदीला देखील अश्या प्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शीलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेंव्हा त्यासाठी कुणाला जवाबदार ठरवू मी ?

स्त्रीच्या रजस्व रुपाचे महत्व सांगत स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचारां विरुध्द रोष व्यक्त केला आहे. आपल्या देशात एकीकडे कामाख्या देवीची, तिच्या योनीची पुजा केली जाते दुसरीकडे लहान मुलींवर अत्याचार होतत. स्त्रीयांच्या रजस्व संस्काराला ज्या देशात मान दिला जातो त्याच देशात तिच्यावर अत्याचार होतात, यासाठी कोण जबाबादार आहे? असा प्रश्न कामाख्या देवीच्या या रुपात तेजस्वीनीने मांडला आहे. तिच्या या फोटोला फेसबुक इंस्टाग्रामवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या वर्षीदेखील तिने नवरात्रात देवीची नऊ रुपे साकारली होती. यावर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिने 'कोल्हापूरची अंबाबाई'च्या रुपातील स्वत:चा एक फोटो शेअर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT