

CSMT station Crime Case
ESakal
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे पोलिसांच्या कोठडीत असणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमरान शेख असे मृत तरुणाचे नाव असून रोजगारासाठी दोन दिवसांपूर्वीच तो मुंबईत आला होता. यावेळी आरपीएफ चौकीशी संपर्क साधत असताना त्यांच्यात वाद होताच, मारहाण केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले होते.