कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाउन यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास १०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या तेलुगू अभिनेत्री पावला श्यामला Pavala Syamala यांना आर्थिक मदतीची गरज आहे. पावला यांची तब्येत बरी नसून औषधांचा खर्चसुद्धा त्या उचलू शकत नाहीत. श्यामला यांना एक मुलगी असून तिला टीबीचं निदान झालं आहे. त्यामुळे घरात कमावतं कोणीच नसल्याने अभिनेत्रीवर उपासमारीची वेळ आली आहे. (Telugu actor Pavala Syamala in financial straits can not afford to buy groceries)
श्यामला या ७० वर्षांच्या आहेत. त्यांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र तेदेखील मिळत नसल्याचा खुलासा त्यांनी केला. 'तेलंगणा सरकारकडून वृद्धांसाठी मिळणारं पेन्शन मला गेल्या काही महिन्यांपासून मिळत नाहीये. माझ्यासाठी आणि मुलीसाठी दोन वेळचं जेवणसुद्धा मिळवणं कठीण झालं आहे,' अशा शब्दांत त्यांनी व्यथा मांडली.
'औषधांचा खर्च दर महिन्याला दहा हजारांपर्यंतचा आहे. कोरोनामुळे सध्या मदतीसाठी कोणी पुढे सरसावत नाही. आम्ही अन्नधान्यसुद्धा खरेदी करू शकत नाही आहोत', असं त्या म्हणाल्या. श्यामला यांच्या या मुलाखतीनंतर काही कलाकारांनी त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याआधी चिरंजीवी आणि पवन कल्याण यांसारख्या कलाकारांनी त्यांची आर्थिक मदत केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.