Ketaki Chitale Latest News esakal
मनोरंजन

केतकी चितळेला ठाणे कोर्टाकडून जामीन, तरीही राहणार जेलमध्ये

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर अडचणीत सापडलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्यान्वये जामीन मंजूर केला आहे. तिला २५ हजार रूपयांच्या जामीनावर सध्या जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Ketaki Chitale Latest News)

केतकी चितळेला ठाणे कोर्टाने दिलासा दिला असला तरीही ती तुरूंगातच राहणार आहे, कारण ती आणखी एका प्रकरणात आरोपी आहे ज्या प्रकरणात 21 जून रोजी जामीनावर सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्यानंतर केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती. पवारांवर वाईट शब्दांत टीका करणाऱ्या केतकीच्या त्या पोस्टनंतर राज्यभर तिच्याविरोधात आंदोलनं करण्यात आली सोबतच तिच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल करण्यात आले होते. आता केतकी चितळेनं आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

केतकीनं यापूर्वी देखील हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. आता एएनआयनं (Ketki Chitle facebook post) केलेल्या व्टिटमध्ये तिनं पुन्हा नव्यानं हायकोर्टामध्ये सुटकेसाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT