thapki pyar ki fame actress Jigyasa Singh reacts to death rumours says, I'm alive post viral  Esakal
मनोरंजन

Jigyasa Singh: 'चमत्कार! मी जिवंत', मृत्यूच्या अफवेनंतर 'थपकी प्यार की फेम' अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Jigyasa Singh On Her Death Rumours: कलर्स टीव्हीच्या लोकप्रिय शो 'थपकी प्यार की'मध्ये 'थपकी' ही भुमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारी जिज्ञासा सिंह ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2015 मध्ये आलेला या शो मधुन तिने डेब्यू शो केला आणि यानेच तिला लोकप्रियता मिळवून दिली.

गेल्या काही काळात सोशल मिडियावर तिचा मृत्यू झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत होते. तिचा अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. त्यातच जिज्ञासा कुठेही दिसत नसल्याने तिचा खरचं अपघात झालाय की काय अशी चिंता तिच्या चाहत्यांना पडली होती आता त्यातच स्वत: जिज्ञासाने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत याबाबत माहीती दिली आहे.

काही YouTube व्हिडिओंचे स्क्रीनशॉट आपल्या सोशल मिडियावर शेयर करत जिज्ञासाने तिच्या मृत्यूबद्दल खोट्या अफवा पसरवण्यात आल्या आहेत असा खुलासा केला.

या फेक न्यूजवर प्रतिक्रिया देत तिने ती जिवंत आहे आणि प्रत्येकाने या फेक न्यूज पसरवणे थांबवण्याचे आवाहन केले.

Jigyasa Singh

या पोस्टवर ती लिहिते, "हे कोण पसरवत आहेत? मित्रांनो, मी जिवंत आहे! चमत्कारक चमत्कार! या खोट्या बातम्या फेक चॅनेलवर पसरवणे बंद करा,"

आपल्या मृत्यूबद्दलच्या या अफवा वाचून अभिनेत्रीला धक्का बसला आणि तिने अशा निराधार अफवांवर विश्वास ठेवू नये म्हणून सर्वांना कळवण्याचा आणि स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या मृत्यूबद्दलच्या अफवा वाचून तिलाही धक्का बसला होता. जिज्ञासाचा थपकी हा शो 2017 मध्ये शो ऑफ एअर झाला. नंतर, या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये परतली मात्र खराब तब्येतीच्या समस्येमुळे तिने हा शो सोडला. आता तिने अभिनयातुन ब्रेक घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT