Kashmir Files esakal
मनोरंजन

'द काश्मीर फाईल्स' सिनेमा पाहण्यासाठी 'या' पोलिसांना मिळणार सुट्टी

पोलिसांना सुट्या देण्याच्या मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांच्या पोलीस महासंचालकांना सूचना

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काश्मीरी पंडितांच्या विस्थापनावर आधारित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या सिनेमाची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. हा सिनेमा सर्वांना पाहता यावा यासाठी भाजपशासित (BJP) राज्ये विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. यामध्ये मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारनं राज्यातील पोलिसांना आपल्या कुटुंबियांसह हा सिनेमा पाहता यावा यासाठी सुट्टी देण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (The Kashmir Files Police will get leave to watch Kashmir Files movie)

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पोलीस महासंचालकांना सूचना देताना म्हटलं की, "पोलिसांना 'द काश्मीर फाईल्स' हा सिनेमा पाहण्यासाठी सुट्टी मंजूर करावी. या सिनेमाच शुटिंग चांगलं झालं आहे. भोपाळमधील एका व्यक्तीनंही यामध्ये भूमिका साकारली आहे. त्यामुळं हा सिनेमा सर्वांनी बघायला हवा"

मध्य प्रदेशात सिनेमा टॅक्स फ्री

मध्य प्रदेश सरकारनं रविवारी 'द काश्मीर फाईल्स' हा सिनेमा टॅक्स फ्री केला. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते विवेक अग्निहोत्री यांना चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. चौहान यांनी म्हटलं, "जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा. त्यासाठी आम्ही हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे"

काश्मिरी पंडितांच्या निर्वासित होण्याची कथा

अनुपम खेर आणि मिथून चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'द काश्मीर फाईल्स' हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. यामध्ये ९०च्या दशकात काश्मीर पंडितांना कशा प्रकारे बेघर करण्यात आलं हे दाखवण्यात आलं आहे. यामध्ये पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT