Anupam Kher,Mithun Chakraborty,Pallavi Joshi Google
मनोरंजन

The Kashmir Files:सिनेमा पाहून प्रेक्षक रडतायत,एका महिलेनं तर चक्क...

'द काश्मिर फाईल्स' हा सिनेमा अनेक अडचणींना मात देत अखेर ११ मार्च,२०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

प्रणाली मोरे

विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir files) सिनेमा शुक्रवारी ११ मार्च,२०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. काश्मिर नेहमीच धुमसत असतं. इथल्या स्थानिकांचं जीवन अस्थिर. आजच जगणं उद्या नशिबात असेल की नाही ही जाणीव मनात अन् जीव मुठीत घेऊन ते जगतात. अशाच काश्मिर मध्ये १९९० साली काश्मिरी पंडीतांसोबत जे घडलं ते कदाचित किती जणांना माहित कुणास ठाऊक. पण विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स' या सिनेमातनं १९९० साली काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांच्या अत्याचारामुळं आपलंच घर सोडून पळावं लागलं होतं जीव वाचवण्यासाठी. नरसंहारानं काश्मिर पेटलं होतं. सर्व काश्मिरी पंडितांची पीडा,त्यांचा छळ,त्यांच्यासोबत घडलेल्या सगळ्या विदारक गोष्टी या सिनेमातनं मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमातनं काश्मिरचं ते सत्य मोठ्या पडद्यावर मांडताना अनेक अडचणी आल्या. पण अखेर सिनेमा प्रदर्शित झाला.

११ मार्च,२०२२ शुक्रवारी हा सिनेमा सिनेमागृहात अनेक संकटांना पार करुन अखेर प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत चक्क १९९० सालात ज्या काश्मिरी पंडितांसोबत ते दृष्कृत्य घडलं होतं त्या बळी गेलेल्या कुटुंबातील ती एक महिला निघाली. सिनेमा पाहिल्यानंतर ती महिला प्रेक्षक अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होती. तिनं थेट जाऊन तिथे उपस्थित राहिलेल्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे थेट पाय पकडले. सिनेमातील कलाकारांचे आभार मानताना तिचा आवाज कातरत होता,शब्द फुटत नव्हते,सिनेमाच्या निमित्तानं ती पुन्हा जगली होती १९९० साल. काश्मिरी पंडितांसाठी सिनेमाच्या माध्यमातून उठवलेल्या आवाजानं ती भारावली होती. तिच्या भावना पाहून सिनेमातील कलाकरांनाही आपले अश्रू आवरता आले नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तो शेअर केला आहे.

हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अनेक वादांमुळे चर्चेत आला. सुरुवातीला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सिनेमा प्रदर्शित करू नका अशा धमक्या आल्या. त्यानंतर 'द कपिल शर्मा शो' मध्ये सिनेमाचं प्रमोशन करण्यास नकार दिल्यानं रंगलेला वाद आणि आयत्यावेळेला सिनेमातनं एक सीन काढावा लागल्याची चर्चा अशा बऱ्याच घडामोडी झाल्या. पण अखेर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अनुपम खेर,पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती,चिन्मय मांडलेकर,दर्शन कुमार,पुनीत इस्सर,मृणाल कुलकर्णी अशा दर्जेदार कलाकारांनी काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT