The Kerala Story 
मनोरंजन

The Kerala Story: प्रतीक्षा संपली! 'द केरळ स्टोरी' ओटीटीवर होणार रिलीज, कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित? जाणून घ्या...

The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट कोणत्या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? जाणून घेऊयात...

सकाळ डिजिटल टीम

The Kerala Story: अभिनेत्री अदा शर्माचा 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) गेल्या वर्षी रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं तर काहींनी या चित्रपटाला ट्रोल केलं. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट ज्यांनी थिएटरमध्ये नाही पाहिला, ते प्रेक्षक आता हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकणार आहेत. या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली आहे. 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट कोणत्या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? जाणून घेऊयात...

कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर 'द केरळ स्टोरी' होणार प्रदर्शित?

ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट रिलीज होणार आहे. ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, "प्रतीक्षा संपली! बहुप्रतिक्षित 'द केरळ स्टोरी' चित्रपट लवकरच ZEE5 वर प्रदर्शित होत आहे!" ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द केरळ स्टोरी हा चित्रपट 16 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

सुमारे 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 241 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

'द केरळ स्टोरी' ची स्टार कास्ट

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात शालिनी, निमा, गीतांजली, असिफा या चार मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. यामधील शालिनी ही भूमिका अदा शर्मानं साकारली आहे. योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बालानी या अभिनेत्रींनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. आता 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

अदा शर्माचा आगामी चित्रपट

द केरळ स्टोरीनंतर आता अदा शर्माचा 'बस्तर द नक्सल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. हा चित्रपट 15 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT