these filmstars shared post for congratulate maharashtras new cm eknath shinde
these filmstars shared post for congratulate maharashtras new cm eknath shinde sakal
मनोरंजन

मनोरंजन विश्वातून एकनाथ शिंदेंचं दणक्यात स्वागत, या कलाकारांचे ट्विट चर्चेत

नीलेश अडसूळ

eknath shinde : महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळाला आता पूर्णविराम लागलाय असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आणि महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्काच ठरला. कारण गेली काही दिवस शिंदे यांचे बंड, गुवाहाटी दौरा या सगळ्याने मोठी राजकीय उलथपालथ निर्माण झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आले. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे वाटत असतानाच एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अडीच वर्षे सुरू असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. अगदी कालच ३० जून रोजीच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीही झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (these filmstars shared post for congratulate maharashtras new cm eknath shinde and deputy cm devendra fadanvis)

मराठीतील अभिनेत प्रसाद ओक, आरोह वेलणकर, विजू माने यांनी तर एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्याच पण चक्क बॉलीवुड मधूनही एकनाथ शिंदे यांचे कौतुक झाले. धाकड गर्ल कंगनाने ही 'एक रिक्षावाला थेट राज्याचा मुख्यमंत्री होतो.. शी खरी प्रेरणादायी यशोगाथा आहे' असे तिने लिहिले आहे. तर बॉलीवुड अभिनेता रितेश देशमुखनेही ट्विट करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी रितेशने दोन ट्विट केले आहे. त्यातील एका ट्विटमध्ये रितेशने एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर केला आहे. 'श्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा,' असेच ट्विट त्याने देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारी एक पोस्ट लिहिली. त्यावरून बराच वादही झाला. मदत नेमकी उद्धव ठाकरे यांनी केली शिंदे यांनी यावर बोलले गेले. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरही पोंक्षे यांनी कौतुकाचा वर्षाव केलं. 'मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचं अभिनंदन' असं म्हणत पोंक्षे यांनी पोस्ट शेअर केली आहे. यासह अनेक कलाकार आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन शुभेच्छा देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT