tejashri pradhan instagram
मनोरंजन

तेजश्रीने 'या' कारणामुळे सोडली 'अग्गंबाई सासूबाई' मालिका

तिने साकारलेली 'शुभ्रा'ची भूमिका चांगलीच गाजली.

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' Aggabai Sasubai ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आशुतोष पत्की Ashutosh Patki आणि तेजश्री प्रधान Tejashri Pradhan ही एक नवीन जोडी या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. शुभ्रा आणि सोहम यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना आवडू लागली होती. तर या मालिकेने काही पुरस्कारसुद्धा पटकावले होते. आता ही मालिका 'अग्गंबाई सूनबाई' या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेत निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या भूमिका त्याच असल्या तरी सोहम आणि शुभ्रा साकारणारे कलाकार मात्र बदलले आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तेजश्रीने मालिका का सोडली, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. यावर आता खुद्द तेजश्रीने उत्तर दिलं आहे. (this is why tejashri pradhan left from aggabai sasubai marathi serial)

पहा, तेजश्री प्रधान काय म्हणाली?

'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत अभिनेत्री उमा पेंढारकरने तेजश्रीची जागा घेतली आहे. तर अभिनेता अद्वैत दादरकर हा सोहम ऊर्फ बबड्याची भूमिका साकारतोय.

पाहा तेजश्री प्रधानची संपूर्ण मुलाखत-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT