Tiger 3 star Emraan Hashmi Reveals He Made Many Enemies
Tiger 3 star Emraan Hashmi Reveals He Made Many Enemies esakal
मनोरंजन

Emraan Hashmi: ऐश्वर्याला म्हणाला होता 'प्लॅस्टिक', काय होतं कारण? बॉलीवूडमध्ये त्यानं घेतला अनेकांशी पंगा!

युगंधर ताजणे

Tiger 3 star Emraan Hashmi Reveals He Made Many Enemies : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं आणि हटक्या स्टाईलनं वेगळी ओळख तयार करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये इम्रान हाश्मीचे नाव घ्यावे लागेल. बॉलीवूडमधील सीरियल किसर म्हणूनही त्याचे नाव चर्चेत राहिलं आहे. तो आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या टायगर ३ मध्ये व्हिलनच्या भूमिकेत आहे.

सलमानचा टायगर ३ हा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. त्याला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. अशावेळी इम्रान हाश्मीच्या भूमिकेनं नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे. त्याचे कौतुक होत आहे. आता तर त्याच्या एका जुन्या मुलाखतीनं पुन्हा एकदा तो ट्रेंडिंगचा विषय आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

सध्या इम्रान हा त्याच्या टायगर ३ मुळे जोरदार चर्चेत आला आहे. त्यानं या चित्रपटातून पहिल्यांदाच सलमान खानसोबत स्क्रिन शेयर केली आहे. ज्यामुळे तो लाईमलाईट आला आहे. कधीकाळी प्रसिद्धीच्या कमालीच्या झोतात आलेल्या इम्रान हाश्मीच्या लोकप्रियतेचा टेंपो हा अचानक खाली आला होता. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळामुळे देखील चर्चेत आला होता.

टायगर ३ च्या निमित्तानं इम्रान हा वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देतो आहे. त्यातून तो त्याच्या बॉलीवूडच्या प्रवासाला उजाळा देतो आहे. यावेळी त्यानं एका मुलाखतीतून प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉयवर जे वक्तव्य केले होते याबद्दल सांगितले. मी फारसा मुलाखतींना जात नाही. कारण मी त्या मुलाखतींमध्ये कंफर्ट नसतो. अनेकदा मी रागाच्या भरात काहीही बोलून जातो. असेही त्याचे म्हणणे होते. मी जर आता परत कॉफी विथ करणमध्ये गेलो तर सगळं बिघडून टाकेल.

खरं सांगतो माझ्या मनात कुणाविषयी काहीही नाही. मला कुणाविषयी वाईट बोलायचं नाही. मी तेव्हा ज्यांच्याविषयी बोललं होतं तेव्हा मला ते गिफ्ट हॅम्पर जिंकायचे होते. मला असं विचारण्यात आलं होतं की, प्लॅस्टिक म्हटल्यावर तुझ्या डोळ्यासमोर कुणाचं नाव येतं, तेव्हा इम्राननं ऐश्वर्याचे नाव घेतले होते. आणि त्याच्यावर खूप टीकाही झाली होती.

इम्रान हाश्मीला त्याच्या त्या वक्तव्यावर अखेर माफी मागावी लागली होती. त्यानं जाहीररित्या दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानं म्हटलं होतं की, तो फक्त एक गेम खेळत होता. आणि मला ते गिफ्ट हॅम्पर जिंकायचे होते. म्हणून आपण त्या प्रकारचे वक्तव्य केले होते. यावेळी इम्राननं असंही म्हटलं होतं की, आपण ते वक्तव्य करुन अनेकांची नाराजी ओढावून घेतली होती. त्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT