Dhanush and Aishwarya  esakal
मनोरंजन

धनुषचं ऐश्वर्यासाठी महिन्यानंतर ट्विट, तिचं उत्तर होतं...

आता आम्ही संमतीनं दुसऱ्या प्रवासासाठी निघालो असल्याचे धनुषनं सांगितलं होतं.

सकाळ ऑनलाईन टीमसा

Tollywood News: टॉलीवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणून (Entertainment News) धनुषला देश ओळखतो. दुसरीकडे तो दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये (South Movie) देवाची उपमा दिल्या गेलेल्या रजनीकांत (Rajnikanth) यांचा जावई असल्यानं ती ओळख देखील त्याची लोकप्रियता वाढवते. गेल्या काही दिवसांपूर्वी धनुषनं ऐश्वर्याला घटस्फोट दिल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. ऐश्वर्या आणि धनुष एकमेकांपासून वेगळे होत आहेत हे ऐकून चाहत्यांना धक्काच बसला होता. धनुषनं सोशल मीडियावर वेगळी पोस्ट शेयर करुन आमच्यातील नातं आता संपुष्टात आलं असून आम्ही परस्पर संमतीनं वेगळं होत असल्याचे सांगितले होते. आता धनुषनं ऐश्वर्यासाठी खास पोस्ट शेयर केली आहे. त्यावर तिनं दिलेलं उत्तराची चर्चा सुरु झाली आहे.

ऐश्वर्यानं धनुषच्या त्या व्टिटला रिप्लायही दिला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना नवल वाटले होते. ऐश्वर्याची जीवाभावाची मैत्रीण श्रृती हसन ही त्यांच्या घटस्फोटाला कारणीभूत असल्याच्या बातम्याही व्हायरल होत होत्या. मात्र त्याबाबत अजुन ठोस काहीही माहिती नाही. रजनीकांतच्या जावयानं जेव्हा घटस्फोटाची चर्चा करण्यास सुरुवात केली तेव्हापासुनच अनेकांनी त्याला वेगवेगळे प्रश्नही विचारले होते. चाहत्यांना धनुष आणि ऐश्वर्या हे कधी वेगळे होतील अशी कुणाला शंकाही आली नव्हती. म्हणून त्यांना कमालीचे वाईटही वाटले होते. आता दोघेजण आपआपल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्यानं पयानी नावाचं गाणं रिलिज केलं होतं. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी त्या गाण्याला धनुषनं शुभेच्छा दिल्या होत्या, त्यावेळी त्यानं केलेल्या व्टिटमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले. धनुषनं लिहिलं होतं की, ऐश्वर्या या माझ्या मैत्रीणीला तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी मनपूर्वक शुभेच्छा. त्यावर ऐश्वर्यानं धनुषला धन्यवाद असं म्हणून रिप्लाय केला आहे. नेटकऱ्यांमध्ये या उत्तराची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. यापूर्वी धनुषनं जानेवारीमध्ये एक पोस्ट शेयर केली होती. त्यामध्ये त्यानं आम्ही 18 वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे होत असल्याचे सांगितले होते. आमचा प्रवास एवढाच होता. आता आम्ही संमतीनं दुसऱ्या प्रवासासाठी निघालो असल्याचे धनुषनं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT