Happy Birthday Nayanthara Esakal
मनोरंजन

Happy Birthday Nayanthara: प्रभुदेवाच्या प्रेमात बुडाली होती नयनतारा! त्याच्यासाठी इंडस्ट्री सोडली मात्र...

Vaishali Patil

बॉलिवूड स्टार नयनतारा ही तमिळ चित्रपटसृष्टीची मोठी स्टार आहे. अलीकडेच तिने 'जवान' या ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नयनताराने 2003 मध्ये फिल्मी दुनियेत प्रवेश केला. आपल्या दोन दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.

तिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. नयनतारा आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.  ती तिच्या करिअरमध्ये खूप यशस्वी आहे. मात्र तिच्या खासगी आयुष्यामूळे ती खूप चर्चेत होती. एकेकाळी तिचं आणि प्रभूदेवाचं अफेअर खूपच गाजलं होतं.

Happy Birthday Nayanthara

प्रभूदेवा आणि नयनतारा एकमेकांवर फार प्रेम करत होते. असं म्हणतात की प्रभूदेवाच्या प्रेमात नयनतारा सर्व मर्यादा पार करण्यास तयार होती. तिला कोणत्याही परिस्थितीत प्रभूदेवासोबत लग्न करायचे होते.

Happy Birthday Nayanthara

इतकच नाही तर तिने प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने त्याच्या पत्नीला लाच देण्याचाही प्रयत्न केला होता अशी अफवा आहे. नयनताराने त्याच्या पत्नाला 3 कोटी रुपये, काही सोन्याची नाणी आणि 85 लाखांचा हिऱ्याचा हार भेट दिला होता.

Happy Birthday Nayanthara

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभूदेवाची पत्नी लता हिने नयनतारावर अनेक गंभीर आरोप केले होते. नयताराने प्रभूदेवाला घरी पैसे देण्यास आणि कुटुंबाला भेटण्यास मनाई केल्याचा आरोपही प्रभूदेवाची पत्नी लता हिने केला होता.

Happy Birthday Nayanthara

प्रभूदेवाच्या मूलाचं कर्करोगाने निधन झालं. त्यानंतर नयनताराने प्रभूदेवाच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघांच्या प्रेमाच्या फार चर्चा रंगल्या होत्या.

नयनतारासोबत लग्न करण्यासाठी प्रभुदेवाने आपली पहिली पत्नी रामलता हिला घटस्फोट दिला. 16 वर्षांचा संसार मोडत नयनताराशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. प्रभुदेवा आणि नयनतारा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. या अफेअरमुळे तमिळ फिल्म इंडस्ट्रीत प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

पण रामलताला घटस्फोट दिल्यानंतर प्रभुदेवा दिवाळखोर झाला होता. घटस्फोटानंतर प्रभुदेवाला नयनतारासोबत लग्न करण्यास संकोच वाटू लागला. नयनताराने अभिनय सोडल्याने तिच्या आर्थिक स्थितीवरही मोठा परिणाम झाला. अशा परिस्थितीत दोघांमध्ये तणाव वाढला. त्यानंतर नयनताराचा प्रभुदेवासोबत ब्रेकअप झाला आणि ती सर्व सोडून केरळमध्ये आई-वडिलांच्या घरी गेली.

Happy Birthday Nayanthara

त्यावेळी चित्रपट दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार त्याच्या पहिल्या चित्रपटाची तयारी करत होते. अ‍ॅटलीला नयनताराला त्याच्या पहिल्या चित्रपटात कास्ट करायचे होते. पण तोपर्यंत तिने अभिनय सोडला होता. त्यानंतर बराच वेळ समजावल्यानंतर नयनतारानं चित्रपटासाठी होकार दिला.

अ‍ॅटली आणि नयनताराचा हा चित्रपट राजा-राणी होता. जो 2013 मध्ये रिलीज झाला होता. 2 वर्षांच्या ब्रेकनंतर नयनतारा रुपेरी पडद्यावर परतली. या चित्रपटाने तमिळ चित्रपटसृष्टीत खळबळ उडवून दिली आणि प्रेक्षकांनी नयनताराला उत्स्फूर्तपणे स्वीकारले. यानंतर मात्र नयनताराने मागे वळून पाहिलेच नाही. 2015 मध्ये नयनताराने विघ्नेश शिवनशी लग्न केले. आता त्यांना दोन जूळी मूलेही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT