trollers said SRK CHHAKKA but Shah Rukh Khan gives amazing answer  sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: एसआरके छक्का.. म्हणणाऱ्याला शाहरूख खानने दिलं सडेतोड उत्तर ..

शाहरुख खानला ट्रोल केलं खरं, पण त्याचा हजरजबाबीपणा पाहून चाहते झाले खुश!

सकाळ डिजिटल टीम

shah rukh khan: सध्या 'पठाण' चित्रपट जोरदार चर्चेत आहे. ह्या चित्रपटाच्या वादाने नुसता धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरुन सुरू झालेला वाद अद्याप मिटलेला नाही. याच वादादरम्यान शाहरुखचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख वर घाणेरड्या भाषेत टीका करण्यात आली आहे तर शाहरुखनेही ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे.

(trollers said SRK CHHAKKA but Shah Rukh Khan gives amazing answer )

शाहरुख खान त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटातून 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. याआधी शाहरूख 'झिरो' चित्रपटात दिसला होता. एकीकडे चाहते त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत तर दुसरीकडे पठाण चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या चित्रपटाबाबत शाहरूख खानला प्रचंड ट्रोल केले जात आहे. या सगळ्यामध्ये आता शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व एका शोचा थ्रोबॅक व्हिडिओ आहे ज्यामध्ये किंग खान जितेंद्र कुमार आणि निधी बिश्तसोबत बसलेला दिसत आहे. शाहरुख त्याच्या फोनकडे बघून लोकांच्या कमेंट्स वाचतोय, मग त्याची नजर अशा कमेंटवर पडते जिथे जितेंद्र कुमार आणि निधी बिश्त शांत होतो. या कमेंटमध्ये 'एसआरके छक्का' असं लिहिलं आहे.

ही कमेंट पाहून शाहरुख मात्र भन्नाट उत्तर देतो. शाहरूख म्हणतो, 'मी इतका मोठा आहे की मी चौकार, किंवा रन वगैरे मारत नाही... मी फक्त सिक्स मारतो..' शाहरुख खानची ही उत्तर देण्याची स्टाईल चाहत्यांनाही आवडली आहे. लोकांनी या व्हिडिओवर कमेंट करून त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक केले आहे.

किंग खानच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण'मध्ये शाहरुखशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT