Truth behind viral photo of ranu mondal watch video
Truth behind viral photo of ranu mondal watch video  
मनोरंजन

Video : रानू मोंडल यांच्या 'त्या' मेकअप मागचं वास्तव काय?

वृत्तसंस्था

मुंबई : रानुं मंडल हे नाव आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. सोशल मीडियाच्या प्रभावाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. एका रात्रीत रानु मंडल या स्टार झाल्या. रेल्वे स्टेशन ते गायक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. कोलकाताच्या स्टेशनवर मधुर आवाजात गाण्याऱ्या रानु यांचा व्हिीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या खऱ्या अर्थाने स्टार बनल्या. त्यानंतर रानु यांनी हिमेश रेशमियासोबत अल्बम केले, आता त्या सेलिब्रिटी आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचा एक फोटो समोर आला आणि त्यामुळे त्यांना इंटरनेटवर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण त्यांचा मेकअप करणाऱ्या आर्टीस्टने एक व्हिडीओमार्फत त्याचा खुलासा केला आहे. 

रानु मंडल तयार होऊन कानपुरच्या एका इव्हेंटमध्ये पोहोचल्या होत्या. तिथे त्यांनी रॅम्प वॉकही केला. या कार्यक्रमादरम्यानचा त्यांचा एक फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला. या फोटोमुळे रानु यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. त्या फोटोला एडिट करण्यात आलं होतं आणि जास्त मेकअप लावण्यात आला. या फोटोवर नेकऱ्यांनी जोक्स आणि मीम्स तयार केले. पण त्यांच्या मेकअप आर्टीस्टने त्यांच्या मेकअपचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि व्हायरल झालेला फोटो खोटा असल्याचं सत्य समोर आणलं आहे. 

संध्या मेकओवर या पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रानु यांचा मेकअप त्यांनी केला आहे. यामध्ये आर्टीस्टने असं सांगितलं आहे की खूप मेहनतीने रानु यांचा मेकअप करुन त्यांना एक नवा लुक देण्यात आला. मात्र व्हायरल झालेल्या फोटोने सर्व काही बिघडले. मेकअप आर्टीस्ट संध्या म्हणाली, ' तुम्ही दोन्ही फोटो पाहू शकता, एकामध्ये आम्ही रानु य़ांना तयार केलेला फोटो आहे तर दुसरीकडे व्हायरल झालेला फोटो. त्यांच्यावर झालेले मीम्स आणि फोटो तर ठीक आहेत पण अशाप्रकारे त्यांच्यावर हसणे चुकीचे आहे.तुम्ही दोन्ही फोटो पाहू शकता आणि खरं काय आहे ते तुमच्या समोर आहे'. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT