tujhech mi geet gaat ahe serial number one in trp star pravah aai kuthe kaay karte rang maza vegla
tujhech mi geet gaat ahe serial number one in trp star pravah aai kuthe kaay karte rang maza vegla sakal
मनोरंजन

Marathi Serial TRP: दीपा, अरुंधतीला मागे सारत 'ही' मालिका ठरली नंबर 1..

नीलेश अडसूळ

ओटीटीचे प्रस्थ कितीही वाढले तरी मालिकांची जादू काही कमी झालेली नाही. आजही चांदया पासून बांदयापर्यंत घराघरात मालिका पाहत जातात. सध्या मराठीमध्ये पाच वाहिन्या आणि पंचवीस हून अधिक मालिका असल्याने कोणती मालिका 'टीआरपी'च्या रेस मध्ये सर्वात वर आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. गेली काही महीने 'स्टार प्रवाह' वाहिनी यामध्ये सर्वात पुढे आहे तर गेली काही दिवस याच वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' ही मालिका सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका होती. पण यंदा मात्र या मालिकेला मागे सारून नवा विक्रम झाला आहे.

(tujhech mi geet gaat ahe serial number one in trp star pravah aai kuthe kaay karte rang maza vegla)

टीआरपीच्या शर्यतीतही स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा', 'आई कुठे काय करते', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'फुलाला सुगंध मातीचा' आणि 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिका टॉप 5मध्ये आहेत. 'रंग माझा वेगळा' ही मालिका अनेक महिने पहिल्या क्रमांकावर होती. शिवाय 'आई कुठे काय करते' या मालिकेचेही रेटिंग जास्त होते. पण या दोन्ही मालिकांना मागे सारून 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेने यंदा पहिला नंबर पटकावला आहे.

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेला इतके प्रेम देऊन नंबर 1 वर पोहोचवल्याबद्दल मालिकेच्या संपूर्ण टीमनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. मागील आठवड्यात तुझेच मी गीत गात आहे मालिता पाचव्या क्रमांकावर होती. एकाच आठवड्यात मालिकेनं मोठी उडी घेतली आहे. प्रेक्षकांकडूनही मालिकेचं कौतुक करण्यात येत आहे.

मालिकेत सध्या प्रचंड भावुक ट्रॅक सुरू आहे. छोटी चिमुकली म्हणजेच अवनी तायवडे हिनं तिच्या निरागस अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तिचा सहज सुंदर अभिनयानं मालिकेला पहिल्या नंबरवर पोहोचवलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अभिनेता अभिजीत खांडकेकर, प्रिया मराठे, पल्लवी वैद्य, उर्मिला कोठारे सारख्या कलाकारांची फौज मालिकेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT