hardik joshi
hardik joshi 
मनोरंजन

'तुझ्यात जीव रंगला'मधल्या राणादाचा नवीन व्यवसाय; कोल्हापूरकरांनो एकदा भेट नक्की द्या! 

स्वाती वेमूल

'चालतंय की' म्हणत 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या राणादाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच निरोप घेतला. त्यानंतर आता अभिनेता हार्दिक जोशीने स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत हार्दिकने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. 

'आजवर तुम्ही माझ्यावर व माझ्या कामावर खूप प्रेम केलंत. आता मी व्यवसायात पदार्पण करत आहे. या पुढेही आपला असाच पाठिंबा कायम माझासोबत राहील हा मला विश्वास आहे. कोल्हापूर बदाम थंडाई, दिनांक २५ फेब्रुवारी म्हणजे आजपासून आपल्या सेवेत...मग काय येणार नव्हं? यायला लागतंय...चालतंय की..या सायंकाळी ४ नंतर, खाऊ गल्ली खासबाग मैदान कोल्हापूर,' असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या व्हिडीओद्वारे त्याच्या नवीन व्यवसायाला पाठिंबा देण्याची विनंती हार्दिकने चाहत्यांना केली आहे. 

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. राणा आणि पाठकबाई यांची केमिस्ट्री व प्रेमकहाणीसुद्धा त्यांना भावली. हार्दिक सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून गेल्या काही दिवसांपासून तो या व्यवसायाबाबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत होता. अखेर त्याने आज त्याची घोषणा करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. 

याआधी अनेक कलाकारांनी अभिनयाव्यतिरिक्त स्वत:चा वेगळा व्यवसाय सुरु केला आहे. क्रांती रेडकर दागिन्यांचा, निवेदिता सराफ व सई ताम्हणकर साड्यांचा, अपूर्वा नेमळेकरसुद्धा दागिन्यांचा व्यवसाय करतात. 'बिग बॉस मराठी' विजेता शिव ठाकरेनंही स्वत:चा नवीन ब्रँड सुरू केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT