आता ही असेल बबड्याची शुभ्रा; तेजश्री प्रधानच्या जागी आली नवी अभिनेत्री

aggabai sunbai serial
aggabai sunbai serial

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. आगळावेगळा विषय या मालिकेत मांडण्यात आला आणि त्या विषयाला योग्य न्याय देणारे कलाकार त्यात पाहायला मिळाले. मालिकेतील बबड्या, आसावरी, शुभ्रा, अभिजीत ही पात्रं घराघरात पोहोचली. पण आता या मालिकेत खूप मोठा बदल होणार आहे. मालिकेची कथा आता पूर्णपणे बदलण्यात येणार असून त्यातील भूमिकासुद्धा बदलणार आहेत. इतकंच नव्हे तर मालिकेचं नाव 'अग्गंबाई सासूबाई' बदलून 'अग्गंबाई सूनबाई' असं ठेवण्यात आलं आहे. याचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. विशेष म्हणजे या प्रोमोमध्ये आसावरी पूर्ण बदललेली पाहायला मिळाली आणि शुभ्राच्या जागी एक नवीन चेहरा पाहायला मिळाला. 

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत शुभ्रा म्हणजेच सोहमच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली होती. आता तिच्या जागी उमा पेंढारकर शुभ्राची भूमिका साकारणार आहे. त्याचप्रमाणे आसावरीची भूमिका साकारणाऱ्या निवेदिता सराफ यांचीसुद्धा भूमिका पूर्णपणे बदलली आहे. निवेदिता सराफ आणि गिरीश ओक मालिकेत अजूनही आहेत. पण बबड्या कोण असेल याची उत्सुकता ताणली गेली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by swamini (@swamini_official_)

कोण आहे उमा पेंढारकर?
अभिनेत्री उमाने याआधी 'स्वामिनी' या मालिकेत पार्वतीबाईंची भूमिका साकारली आहे. उमा ही मूळची रायपाटणची असून तिचं शिक्षण मुंबईत झालं आहे. तिला लहानपणापासूनच नृत्याची फार आवड आहे. उमाचं लग्न झालेलं असून ती नाट्यतपस्वी भालजी पेंढारकर यांची नातसून आहे. तिच्या पतीचं नाव ऋषीकेश पेंढारकर असं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com