Kalyani Kurale Jadhav Passed Away esakal
मनोरंजन

Kalyani Kurale Jadhav Passed Away: तुझ्यात जिव रंगला फेम कल्याणी कुरुळे-जाधव हिचा अपघाती मृत्यू...

सकाळ डिजिटल टीम

मराठी टिव्हि क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक आणि दुख:द बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव हिचा अपघातात मृत्यू झालेला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा इथं एका डंपरच्या धडकेत तिचा मृत्यू झालेला आहे.

कल्याणीने काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील हालोंडी फाटा येथे ‘प्रेमाची भाकरी’ नावाने हॉटेल सुरू केले होतं.  हॉटेल बंद करुन बाहेर पडत असतांना तिला डंपरने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

या महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. कोल्हापूर सांगली महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. या आधीही या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहे.

कल्याणी मराठी टिव्ही जगतातील एक उभरती अभिनेत्री होती. अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय केला होता. तुझ्यात जिव रंगला या मालिकेतुन ती लोकप्रिय झाली होती. कलाक्षेत्रात आपलं नाव करु पाहणारी एक अभिनेत्री कल्याणीच्या अशा अचानक जाण्याने मराठी मनोरंजन सृष्टिवर शोककळा पसरली आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT